मेष: करिअरमध्ये जुने सहकारी मदत करतील आणि प्रगतीची गती वाढेल. कठीण परिस्थितीत तुमची हुशारी उपयोगी पडेल. व्यापारात नफ्याचे संकेत आहेत; मात्र मोठे निर्णय घेण्यापूर्वी सल्ला घ्या. सरकारी कामात यश मिळू शकते. जुन्या प्रोजेक्टमधील अडकलेले पैसे काळजीपूर्वक हाताळा. आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होईल.
वृषभ: दिवस चांगला, पण सावधगिरी आवश्यक. कायदेशीर कागदपत्रे नीट वाचा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. कुटुंबात शुभकार्याचा योग. घर किंवा वाहनावर खर्च वाढू शकतो. परदेशाशी संबंधित कामात सकारात्मक ईमेल येण्याची शक्यता.
मिथुन: वेळ वेगाने पुढे सरकेल; काही बाबतीत संभ्रम राहू शकतो. प्रोजेक्टमध्ये वेगामुळे काही जण प्रभावित तर काही मत्सरी होऊ शकतात. नवीन कौशल्य किंवा कोर्स करिअरला नवे वळण देईल. लेखन, सोशल मीडिया, पत्रकारिता, डिजिटल क्षेत्रात यश.
कर्क: करिअर व व्यवसायासाठी लाभदायक दिवस. भागीदारीत फायदा. नवीन ग्राहक व ऑर्डर मिळण्याचे संकेत. प्रमोशन किंवा जबाबदारी वाढू शकते. वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. रिअल इस्टेट क्षेत्रासाठी चांगले व्यवहार.
सिंह: दिवस थोडा अस्थिर. संयम आवश्यक. वरिष्ठांशी वाद टाळा. आयात-निर्यात व मीडिया क्षेत्रात लाभ. अनावश्यक खर्च टाळा. मेहनतीनुसार फळ मिळेल.
कन्या: धावपळीचा दिवस, पण मान-सन्मान वाढेल. विरोधक निष्प्रभ ठरतील. गुंतवणुकीसाठी शुभ वेळ, मात्र दीर्घकालीन विचार करा. प्रॉपर्टी, कन्सल्टन्सी, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती. घरात आनंदी वातावरण.
तूळ: करिअरमध्ये विशेष प्रगती. नवीन व्यवसाय योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ. कर्जप्रकरणात यश. प्रमोशनचे संकेत. बँकिंग, शिक्षण, कायदा, प्रशासन क्षेत्रात यश.
वृश्चिक: वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून करिअरला दिशा मिळेल. बदल सकारात्मक. मीडिया, लेखन, राजकारण, पोलीस सेवेत लाभ. गुंतवणूक फायदेशीर; मोठे निर्णय संयमाने घ्या. जुन्या वादातून सुटका.
धनु: मेहनतीचे फळ मिळेल. धनलाभाचे संकेत. लीडरशिप भूमिकेत यश. मोठा क्लायंट मिळू शकतो. नवीन डील करताना कागदपत्रे तपासा. उत्पन्नासोबत खर्चही वाढेल.
मकर: धनलाभाचा योग. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. करिअरमध्ये स्पर्धा वाढेल. प्रामाणिकपणा व संयम ठेवा. ऑनलाइन कोर्स, मार्केटिंग, ब्युटी प्रॉडक्ट क्षेत्रात लाभ.
कुंभ’ वातावरण सकारात्मक. अडकलेली कामे पूर्ण होतील. गुंतवणुकीत जोखीम टाळा. सरकारी नोकरीत प्रमोशनची शक्यता. कायदेशीर प्रकरणात यश. कुटुंबासोबत प्रवासाचे योग.
मीन: आर्थिक स्थितीत सुधारणा. शिक्षण, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रात नवीन प्रोजेक्ट. बचत करा. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. उधारी देताना विचार करा.