मेष: आज कामात सहकार्य मिळाल्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. घरात गुंतवणुकीबाबत चर्चा होऊ शकते. ऑनलाइन व्यवसाय आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल.
वृषभ: मानसिक शांतता आणि समाधान लाभेल. व्यवसायात नवीन डील होण्याची शक्यता आहे. राजकारण किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधितांना यश मिळेल. शेती, धातू, बांधकाम आणि आयात क्षेत्रात लाभाचे संकेत.
मिथुन: दिवस चांगला असला तरी सावध राहणे आवश्यक. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. मालमत्तेबाबत वाद टाळावेत. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळी एखादे थांबलेले काम पूर्ण होऊ शकते.
कर्क: धनलाभाचे योग आहेत. कामातील कौशल्याचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. बँकिंग आणि रिटेल क्षेत्रात आर्थिक उलाढाल वाढेल. संध्याकाळी आनंददायी बातमी मिळेल.
सिंह: वाद टाळण्यासाठी संयम आवश्यक. आईशी मतभेद होण्याची शक्यता. संपत्तीच्या कागदपत्रांवर सही करताना दक्षता घ्या.
कन्या: कामाचा ताण वाढेल. आयटी, प्रोग्रामिंग आणि डिजिटल क्षेत्रात लाभ. घरात मंगलकार्याचे संकेत.
तूळ: आर्थिक समाधान लाभेल. प्रवासातून चांगला अनुभव मिळेल. कन्स्ट्रक्शन आणि ऑटोमोबाइल क्षेत्रात मेहनतीनंतर यश.
वृश्चिक: आरोग्याकडे लक्ष द्या. तपासणी करून घ्या. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. फायनान्स आणि अकाउंट्स क्षेत्रात उत्पन्न वाढण्याची शक्यता.
धनु: धाडसी निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस. कुटुंबाचा पाठिंबा लाभेल. सोलर एनर्जी आणि इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात नफा.
मकर: कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात लाभदायक प्रवास.
कुंभ: अचानक वाद निर्माण होऊ शकतात. कामात रिवर्क वाढेल. फार्मा आणि केमिकल व्यवसायात कागदपत्रे व्यवस्थित ठेवा.
मीन:वैवाहिक जीवनात तणाव संभवतो. सासरकडील व्यवहारात सावधगिरी बाळगा. हेल्थकेअर आणि इम्पोर्ट-एक्सपोर्ट क्षेत्रात तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक.