मेष: आज लाभाचा दिवस असून मेहनत जास्त करावी लागेल. यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष आहे. तुम्हाला अनोळखी लोकांचे सहकार्य मिळू शकते. अचानक येणारे अडथळे तुम्ही उत्तम प्रकारे पार कराल. तुम्ही व्यवसायात ज्या योजना आखल्या आहेत त्याला आर्थिक सपोर्ट मिळेल. जे लोक फ्रिलान्स करत आहेत त्यांना मोठे प्रोजेक्ट मिळतील. नोकरीत विरोधक काही करणार नाहीत. संध्याकाळी करिअर संदर्भात चांगली बातमी मिळू शकते.
वृषभ: जास्त उत्साह आणि तत्परतेमुळे कामे बिघडू शकते. काही आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी सध्या तुमच्यावर दबाव टाकतील. करिअर संदर्भात चांगली बातमी मिळेल तसेच जुन्या मित्रांशी भेटी होतील, अनावश्यक खर्च टाळा आणि गुंतवणूक करा.घरातून जे लोक काम करत आहेत त्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी होतील. तुमच्या ज्ञानाचे कौतुक होणार आहे.
मिथुन: आजचा दिवस अडचणींनी भरलेला असेल. तुम्हाला कौटुंबिक बाबतीत पैशाशी संबंधित कोणताही निर्णय घ्यावा लागू शकतो. तुमचा मान-सन्मान वाढेल आणि अचानक धनलाभही होईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. तुम्ही केलेल्या कामांना विरोध होईल. कुटुंबातील समस्यांच्या संबंधात कोणताही चुकीचा निर्णय घेणे कठीण होईल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल.
कर्क: आजचा दिवस शुभ योगाचा आहे. तुम्हाला मेहनत करावी लागेल तरच लाभ होईल. प्रवासाचा योग आहे त्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागेल. मानसिक त्रासामुळे मनात काही कारणाने भीती निर्माण होवू शकते. अपूर्ण कामे तुम्हाला पूर्ण करावी लागतील. सुख आणि दुःख समान समजून सर्वकाही नशिबावर सोडून देणे योग्य नाही. मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे लाभ होईल. तुमच्या प्रयत्नांमध्ये काहीही कमतरता ठेवू नका.
सिंह: सर्व कामे वेळेवर पूर्ण होताना दिसतील. तुमचे मन आनंदी असेल. तसेच अशा काही घटना घडतील त्यामुळे ऑफिसमध्ये तुमचा शब्द प्रमाण मानला जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यापार आणि व्यवसायाशी संबंधित अनेक नवीन अनुभव येतील. व्यापार आणि व्यवसायात प्रगतीचे शुभ योग आहेत. तुमच्या धन संपत्तीत वाढ होणार असून रखडलेली कामे पूर्ण होतील.
कन्या: करिअरमध्ये प्रगतीचे शुभ योग आहेत. उत्सव आणि सणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजातील धार्मिक कार्यात सहभागी होवून दानधर्म करणार आहात. आहार आणि आरामकडे लक्ष द्या त्यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. तब्येत चांगली राहणे गरजेचे आहे तरच कामे पटापट मार्गी लागतील. चांगली बातमी मिळाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल.
तुळ: करियरच्या बाबतीत प्रगती तसेच व्यवसायात तुमच्या योजना एकामागून एक यशस्वी होतील. अडचणी सुरु असतील तर त्या सुटत जाणार आहेत. पोट आणि डोळ्यांचा त्रास डोके वर काढणार आहे असे काही झाले तर त्वरित तपासणी करा. ऑफिसच्या कामात अस्थिरता असेल. वेळेनुसार चालल्यास तुम्ही प्रगती होईल अन्यथा वेळ तुम्हाला मागे सोडून देईल. तुमच्यासाठी लाभ आणि प्रगतीचे योग आहेत..
वृश्चिक: करियरच्या बाबतीत लाभ होईल. तुम्ही किचकट कामे वेळेत पूर्ण करणार आहात. फायदेशीर उपक्रमही यशस्वी होतील. मानसिक गुंतागुंतीमुळे डोकेदुखीची शक्यता आहे. तुम्ही आरामाकडे लक्ष द्या. अती कामामुळे रात्री जागून काम करणे योग्य नाही. मुलांच्या बाजूने तुम्ही काळजी वाढू शकते. शेजाऱ्यांमुळे काही त्रास होऊ शकतो पण ही समस्या हाताळताना संयम ठेवा..
धनु: करियरच्या बाबतीत अडचणींनी भरलेला दिवस आहे. पण त्यावर मेहनतीने मात करणार आहात. तुमचा प्रभाव आणि उत्साह वाढलेला असले. चांगली बातमी आल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मित्रांचे सहकार्य मिळाल्यामुळे तुम्ही ऑफिसची कामे पटापट मार्गी लावणरा आहात. व्यापारात प्रगतीचे योग असून परदेशातून ऑफर येवू शकतात. घरासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करा.
मकर: करिअरच्या बाबतीत यशाने भरलेला दिवस आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंद साजरा करणार आहात तसेच पार्टीचा मूड असेल. मित्रांचे सहकार्य मिळेल समस्येवर तोडगा सापडेल. कोणतीही स्थावर किंवा जंगम मालमत्तेवर जर कुटुंबातील काही सदस्यांसोबत वाद सुरु असेल तर तो सुटण्याची शक्यता आहे. विचार केलेली कामे यशस्वी होतील. तुमच्या कामात प्रगती असून व्यवसायातील योजना यशस्वी होतील
कुंभ: कोणावरही अनावश्यक संशय घेऊ नका. वादविवाद करु नका त्यामुळे वेळ आणि पैशाचे नुकसान होईल. नियोजित कार्यक्रमही यशस्वी होतील आणि आर्थिक लाभाची चांगली संधी मिळेल. माहेरच्या लोकांकडून धनलाभ होईल आणि रखडलेल्या इच्छा पूर्ण झाल्याने खूप आनंदी असाल. जे फ्रिलान्स करत आहेत त्यांच्यासाठी प्रगतीचे योग आहेत, तुम्हाला परदेशातून कामाची ऑफर मिळेल.
मीन: तुम्ही हुशारीने उत्तम व्यवहार करून सर्व काही मिळवू शकता. तुमचे विरोधक पराभूत होतील. खाण्यापिण्यात संयम ठेवा, जंक फूड खाणे घातक ठरु शकते. रात्री अपरात्री ऑफिस किंवा व्यवसायाचे काम करु नका. अती ताण घेतला तर कामे होणार नाहीत आणि नुकसान होऊ शकते. जोडीदारापासून आर्थिक कारणांमुळे दूरावा निर्माण होईल. तुमच्या प्रत्येक कामात नशिबाची साथ असेल पण त्याला नशिबाची जोड द्या.