भरपूर व्यायाम करून तसेच योग्य आहार घेऊन देखील जर वजन कमी होत नाही, तर असं असू शकतं कारण. लठ्ठपणा कोणालाही आवडत नाही व लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो, तरी देखील म्हणावा असा फायदा मिळत नाही. नक्कीच आपण यापैकी चुका करत असाल, त्यामुळे आपले वजन कमी होत नाही.
कॅलरी योग्य पध्दतीने न घेणे
बऱ्याच वेळा आपण भरपूर व्यायाम करून विचार करतो की, आपण बारीक होऊ किंवा सडपातळ होऊ शकतो. परंतु आपण जेवढ्या कॅलरीज बर्न करतो, तेवढे खाणार असाल तर वजन कमी होणे अशक्य आहे.
दारूचे व्यसन
आरोग्यासाठी दारू धोकादायक आहे. तसेच अल्कोहोल हळूहळू शरीराला कमकुवत व आळशी बनवते.
आळशीपणा
लठ्ठपणा कमी करण्याची लढाई तो पर्यंत जिंकता येत नाही, जो पर्यंत आपण आळशी आहोत. व्यायामा बरोबर आपली दिवसभरात हालचाल होणे गरजेचे आहे.
सतत ट्रेस घेणे
तणावामुळे शरीरात विशिष्ट हार्मोन्स मध्ये वाढ होऊ शकते, यामुळे पचन व्यवस्थित न झाल्यास वजन कमी होण्याची किंवा पोटावरील चरबी कमी होण्याची शक्यता कमी होते. आपण तणावाचे नियंत्रण करण्यासाठी ध्यान करू शकतो.
डायट मध्ये प्रोटीनची कमी
वजन कमी करण्यासाठी आपण आहार खूप कमी करतो व त्या बरोबरच आपल्याला डायट मध्ये प्रोटीनची कमी भासते, ज्यामधून आपल्याला अधिक ऊर्जा मिळते तेच आपण आहारात कमी केल्याने आपले चयापचय देखील कमी होते. जरी वजन कमी झाले तरी स्नायू कमकुवत होतात, व त्यानंतर नुकसान समोर येण्यास सुरुवात होते.
पूर्ण झोप न घेणे
उशीरा पर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे शरीरासाठी धोकादायक आहे. कमी झोपेमुळे आळस व जंक फूड खाण्याची देखील तीव्र इच्छा होईल, या दोन्ही गोष्टी शरीरासाठी हानीकारक आहे, त्यामुळे सहा ते आठ तास तरी किमान झोप घेणे गरजेचे आहे.
वेट लिफ्टिंग सारखे व्यायाम
वजन कमी करण्यासाठी वजन उचलण्याचा व्यायाम फारसा फायदा देत नाही, परंतु वजन कमी करण्यासोबत स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढवण्याचे व्यायाम प्रकार मदत करतात. पोट आणि मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी वेटलिफ्टिंग चे व्यायाम प्रकार करावे. दिनचर्या, आहार, व्यायाम, झोप, ताण-तणाव, चुकीच्या सवयी व मनःशांती अश्या सर्व गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
(सोशल मीडियावरून साभार)