दालचिनी खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

आरोग्य

दालचिनी ही एक नैसर्गिक औषधी मसाला आहे, ज्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. विशेषतः घसा खवखवत असल्यास, आवाज बसल्यास किंवा खोकला असल्यास, दालचिनीचा छोटा तुकडा चघळणे हा एक घरगुती प्रभावी उपाय आहे.

दालचिनी चघळण्याचे फायदे

१) घशातील कफ मोकळा होतो: दालचिनी मध्ये गरम प्रकृतीचे घटक असल्यामुळे घशातील साचलेला कफ सहज मोकळा होतो.

२) आवाज पूर्ववत होतो: आवाज बसलेला असल्यास, दालचिनीचा तुकडा चघळल्याने आवाज पुन्हा सामान्य होण्यास मदत होते.

३) सर्दी खोकल्यावर आराम: दालचिनीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गजन्य त्रासांवर उपयोगी पडतात.

४) घशाच्या जळजळीवर आराम: दालचिनी मधील नैसर्गिक तेल घशात थेट प्रभाव टाकते व खवखव कमी करते.

५) श्वसन मार्ग साफ होतो: घशासोबतच दालचिनी फुफ्फुसात साचलेला कफ बाहेर टाकण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत