आरोग्यदायी शेवग्याचे सूप

आरोग्य

शेवग्याच्या शेंगा अत्यंत पौष्टिक असतात. त्यामध्ये प्रथिने असतात. तसेच अनेक जीवनसत्वे असतात. फॉस्फरस असते. भरपूर फायबर असते. तसेच शेंगा खाल्याने हाडे मजबूत होतात. दातांच्या आरोग्यासाठी शेवगा फार चांगला. शेवग्याने पचनक्रियाही सुधारते. मधुमेह, हृदय विकार, आदी सर्वच आजारांवर शेवगा हे उपयुक्त औषध आहे.

वजन कमी करण्यासाठी खूप जण मोरींगा पावडर विकत घेतात. हा मोरींगा प्रकार दुसरा तिसरा काही नसून शेवग्याच्या शेंगांची पावडर आहे. आपल्या भारतीय आहारात अनेक वर्षांपासून या शेवग्याला महत्व आहे. घरीच या शेंगांचे विविध पदार्थ तयार करून खाणे हे विकतच्या मोरींगा पावडर पेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. शेवग्याची आमटी आपण घरी तयार करतोच. चवीला फारच छान असते. तसेच काही घरात शेवग्याची भाजी तयार करतात. जी पौष्टिक असते. शेवग्याचे अजूनही काही पदार्थ तयार करता येतात. त्यातील एक म्हणजे शेवग्याचे सूप अत्यंत पौष्टिक आहे. वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरते.

साहित्य: शेवग्याच्या शेंगा, पाणी, मीठ, हळद, जीरं, हिंग, तूप

कृती: चांगल्या ताज्या शेवग्याच्या शेंगा वापरा. जून शेंग नको. शेंगा व्यवस्थित धुवून घ्या. शेंगांचे तुकडे करून घ्या. कुकरच्या भांड्यात शेंगाचे तुकडे घ्या. त्यात पाणी घाला. पाण्यात शेंगा पूर्ण बुडतील एवढं पाणी वापरा. त्यात मीठ घाला. हळद घाला आणि कुकरच्या ३ ते ४ शिट्या काढून घ्या. आता त्या शेंगा कुकर मधून काढून घ्या. जरा गार होऊ द्या. ज्या पाणीत उकडल्यात त्याच पाण्याबरोबर शेंगा मिक्सर मधून फिरवून घ्या. पाणी कमी असेल तर जास्तीचे वापरा. अगदी पातळ करून घ्या. नंतर व्यवस्थित गाळून घ्या. चोथा काढून टाका. शेंगांचा रस वाया जाऊ देऊ नका. एका कढईत तूप गरम करा. त्यात जीरं, हिंगाची फोडणी तयार करा. मग त्यात तयार रस घाला. आणि एक उकळी काढून घ्या. चवीनुसार मीठ घाला.

(सोशल मीडियावरून साभार)