कान दुखणे घरगुती उपाय 

आरोग्य

कान दुखणे हा त्रास सर्वानाच कधीनाकधी होत असतो. विशेषतः लहान मुलात हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक कारणांमुळे कान दुखत असतात. यामध्ये प्रामुख्याने कानात झालेल्या इन्फेक्शन मुळे कान दुखतात. याशिवाय सर्दी झाल्यामुळे तसेच कानात मळ अधिक झाल्यानेही कान दुखू लागतो. यासाठी कान दुखणे याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय तसेच औषध उपचारांची माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी दिली आहे.

कारणे

कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याने.

सर्दी झाल्याने सायनस इंन्फेकशनमुळे.

हिरड्या सुजल्याने.

कानात मळ अधिक झाल्याने.

कानाचा पडदा फाटल्याने.

कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालून जखम झाल्याने.

कानात इंज्यूरी किंवा मार लागल्याने.

घरगुती उपाय

लसूण: दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक करून मोहरीच्या तेलात गरम कराव्यात. थंड झाल्यावर तेल गाळून घ्यावे. ह्या तेलाचे २-३ ड्रॉप्स दुखणाऱ्या कानात घालावे. यामुळे कान दुखणे थांबण्यास मदत होईल. याशिवाय लसूण रसाचे काही थेंबही कानात घालू शकता.

कांदा: कांद्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात. कांदा थोडा गरम करून त्याचा चमचाभर रस काढावा. या रसाचे २-३ ड्रॉप्स कानात दिवसातून ३ वेळा घातल्यास कान दुखणे कमी होते.

आले: आल्याच्या रसाचे २-३ ड्रॉप्स कानात दिवसातून ३ वेळा घातल्यास कान दुखणे दूर होते. हा आयुर्वेदिक उपाय कान दुखणे यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण आल्यात वेदना व सूज कमी करणारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात.

तुळशीची पाने: तुळशीच्या पानांचा रस काढून त्याचे काही थेंब दिवसातून २ वेळा कानात टाकावे. हा घरगुती उपाय केल्यामुळेही कान दुखणे थांबते.

(सोशल मीडियावरून साभार)