हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका

आरोग्य

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो?

हिवाळ्यात अधिक करून बॉडी टेम्प्रेचर कमी होतं. यामुळे सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतं आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. अशा स्थितीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढतो

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, ‘थंड हवामानामुळे हृदय आणि रक्ताभिसरणाच्या समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची अधिक प्रकरणे दिसू शकतात. यासह रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आणि कमजोर होतात. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होत नाही.

हृदयरोग्यांसाठी सर्वोत्तम तापमान

डॉ. बिमल छाजेड यांनी मुलाखतीत सांगितले की, वैद्यकीय शास्त्रानुसार २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान सामान्य किंवा हृदयाच्या रुग्णांसाठी असते. थंडी वाढली की बाहेरची कामे, बाहेर जाणे, भेटणे कमी होते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. यासह वजन वाढणे, हाय ब्लड प्रेशर, यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्यास काय करावे

हिवाळ्यात शक्यतो सूर्यप्रकाश असताना चालावे. मॉर्निंग वॉक नेहमी रिकाम्या पोटी करावे. आपल्या आहारात सॅलडचा समावेश करावा. बाहेर जाणं टाळत असाल तर, योग किंवा व्यायाम करा. या गोष्टींची काळजी घेतल्यास रक्ताभिसरण वाढेल आणि शिरा आकसण्याचा धोका कमी होईल.

(सोशल मीडियावरून साभार)