शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह तत्त्वाची गरज असते. जर का आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर आपल्याला थकवा आणि धाप लागण्यासारखे त्रास सुरू होऊ शकतात. चला तर मग आज आपण आपल्या शरीरातील लोहाची कमतरता कशा प्रकारे दूर करता येईल हे जाणून घेऊया…
लोहाची कमतरता असल्याची लक्षणे
थकवा येणे, चपळता कमी होणे: स्वाभाविक असले तरी आपण थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवत असल्यास आरयनची कमी असल्याचे संकेत आहे.
हिमोग्लोबिन रक्ताला लाल रंग देतं, ज्यामुळे चेहऱ्याला रंग मिळतो.
हिमोग्लोबिन कमी असल्यास चेहरा फिकट आणि पिवळट दिसतो.
पायऱ्या चढताना किंवा दैनंदिन काम करताना आपल्याला धाप लागत असल्यास लोहाची कमतरता असू शकते.
पाय हालवत राहणे: मुलांना बऱ्याच वेळा असे न करण्यास ताकीद दिली जाते. परंतु संशोधनात आढळून आले आहे की, ज्या लोकांना लोहाची कमतरता असते. त्यांचा स्वतःच्या पायांवर ताबा नसतो आणि त्यांचे पाय न कळतच हालू लागतात.
शरीरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता असल्यावर आपले शरीर प्राधान्यक्रम ठरवतं. केस आणि नख एवढे महत्त्वाचे नाही, जेवढे हृदय आणि मेंदू व्यवस्थितरीत्या काम करणे महत्त्वाचे आहे. म्हणून शरीर केस आणि नखांची काळजी घेणं थांबवत.
शरीरामधील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा
1) गूळ आणि शेंगदाणे: खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. याला आपण नियमाने देखील घेऊ शकता.
2) अंकुरलेले कड-धान्य: घेतल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होईल, हे आपण दररोज सकाळी घेऊ शकता.
3) डाळिंब: यात लोह चांगल्या प्रमाणात असतं. एक ग्लास कोमट दुधामध्ये दोन चमचे डाळिंबाचे चूर्ण टाकून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
4) बिटाचे नियमाने सेवन: आपण आपल्या शरीरातील लोहच्या कमतरतेला दूर करू शकता. बीटरूटला आपण सॅलड रूपात किंवा रस किंवा सूप बनवून देखील पिऊ शकता.
5) ओट्स: आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. याचे सेवन केल्याने आपण लोहाची कमतरता दूर करू शकता.
6) आपल्या आहारामध्ये फळांचा पण समावेश करावा
याचबरोबर नियमितपणाने ड्रायफ्रूट्स सेवन करावे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात बदाम घेण्यापासून देखील करू शकता. बदाम रात्रभर भिजत घालून सकाळी दुधाबरोबर घेणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
7) आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समाविष्ट कराव
यासाठी आपण लिंबाचे सेवन करू शकता. याच्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. आपण सकाळच्या वेळी लिंबू पाणी घेण्यास सुरू करू शकता. त्याच बरोबर सॅलडवर लिंबाचा रस टाकून खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
(सोशल मीडियावरून साभार)