मेष: आजचा दिवस चांगला आहे. तुमचा वेळ काही विशेष व्यवस्थापन किंवा नियोजन करण्यात जाणार आहे. दिवसभर तुम्ही व्यस्त राहणार आहात. तुमचा भौतिक आणि सांसारिक दृष्टिकोन थोडासा बदलू शकतो. तुमचा आत्मसन्मान वाढेल असे काम तुम्ही करत असाल तर त्यात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण ठिक असेल.
वृषभ: आजचा दिवस उत्तम आहे. तुमचा मानसन्मान, प्रतिष्ठा वाढणार असून धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत. व्यावसायिक क्षेत्रात नवे सहकारी किंवा साथीदार मिळतील त्यामुळे भविष्यात लाभ होईल. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होणार असून घरात सुख समाधान असेल.
मिथुन: आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्ही थोडे अस्वस्थ आणि टेन्शनमध्ये असाल. तुमचा दिवस धावपळ आणि काळजी करण्यात जाणार आहे. पत्नीचे अचानक आजारपण किंवा त्यांच्या तब्येतीमुळे तुमचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. घरी पाहुणे आले असतील तर ते जास्त दिवस राहणार आहेत. तुम्हाला आर्थिक तजवीज करावी लागेल. आज निर्णय घेताना संयम आणि शांततेने विचार करा.
कर्क: आजचा दिवस उत्तम आहे. धनलाभाचे योग असला तरी तुमचा खर्च वाढणार आहे. तुमची मिळकत आणि खर्च याची सांगड घालण्याचा प्रयत्न करा. मुलांकडून खुषखबर मिळेल आणि घरात उत्साहाचे वातावरण असेल. बराच काळ प्रलंबित असलेले एखादे काम पुन्हा सुरू करण्याचा उत्तम योग आहे.
सिंह: आजचा दिवस उत्तम आहे. तुमचे प्रत्येक काम मार्गी लागेल आणि सर्व कामात नशिबाची साथ असेल. भाग्यवृद्धीचा योग असून नोकरी असो वा व्यवसाय उत्तम प्रगती होणार आहे. व्यापारात जवळच्या सहकाऱ्यांप्रती निष्ठा आणि सुसंवाद ठेवल्यास तुम्ही सर्वांचे मन जिंकू शकाल. नोकरीत रिलोकशनची संधी असेल तर त्याचा लाभ घ्या, त्यामुळे तुमची उत्तम प्रगती होईल.
कन्या: आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही सगळ्यांना मदत करता आणि सगळ्यांच्या अडचणीत धावून जाता. आजही तुमचा दिवस परोपकारात जाणार आहे. अनेक लोक तुमचा पाठिंबा घेण्यासाठी येतील, तुम्ही त्यांचा आदर करा. या लोकांना मदत केली तर भविष्यात हेच लोक तुम्हाला मदत करतील. नोकरी असो वा व्यवसाय कमी बोलणे लाभदायक आहे. वादविवाद आणि तणावापासून दूर रहा तुमचा अधिक लाभ होईल.
तूळ: आजचा दिवस चांगला आहे. तुमची वेळ उत्तम असून जो काही विचार करणार त्यात लाभ होईल. प्रत्येक काम मार्गी लागेल. विरोधक कमी होणार आहेत आणि एकूणच त्यांचा त्रास फार होणार नाही. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आजचा दिवस आनंदात जाणार आहे. एखाद्या जवळच्या मित्राकडून मदत मिळेल त्यामुळे कामातील अडथळे दूर होतील.
वृश्चिक: आजचा दिवस उत्तम आहे. तुमचे एखादे काम अपूर्ण राहिल असेल तर ते पूर्ण करण्याची संधी मिळेल. एखाद्या कामकाजात चूक झाली असेल तर ते सुधारण्यासाठी वेळ उत्तम आहे. नोकरीत असो वा व्यवसायात संधीचा लाभ घ्या. एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तुम्ही संयमाने वागा आणि चिडचिड कमी करा. यामुळे दिवस आनंदात जाणार आहे.
धनु: आजचा दिवस उत्तम असून अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करु शकता. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवलात तरच तुम्ही समस्यांचा सामना करू शकता. आत्मविश्वाने पुढे जा तुम्हाला नक्की यश मिळेल. सकारात्मक विचारामुळे तुमचे कामकाज व्यवस्थित पूर्ण होईल.
मकर: आजचा दिवस ठिक आहे पण दिवसभर तुम्ही व्यस्त राहणार आहात. तुमचा दिवस सुरु करताना व्यापार- व्यवसायाकडे लक्ष देणे ही तुमची पहिली प्राथमिकता असेल. दुपारपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण होईल असे पाहा त्यामुळे ऑफिसमधील ताणतणाव कमी होईल. एखादे काम किंवा प्रोजेक्ट बाकी असेल तर ते आजच मार्गस्थ करा कारण पुढे त्यासाठी वेळ मिळेलच असे नाही.
कुंभ: आजचा दिवस उत्तम आहे. ग्रह- नक्षत्रांचा चांगला प्रभाव असून भाग्यवृद्धीचे योग आहेत. धनसंपत्तीमध्ये वाढ आणि मान सन्मान देखील वाढणार आहे. विरोधकांचा धुव्वा उडविणार असून तुमचे शत्रू काहीच करु शकणार नाहीत. तुमचे विरोधक किंवा शत्रू कितीही प्रबळ असला तरी अखेरीस तुम्हीच यशस्वी होणार आहात. दिवसभरात अनेक सकारात्मक आणि समाधान देणारे बदल दिसून येतील.
मीन: आजचा दिवस उत्तम आहे. खूप दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात ती गोष्ट घडेल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. आज तुम्ही जास्त रिलॅक्स असाल. घरात एखाद्या शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. धार्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल आणि तिर्थक्षेत्राला भेट देण्याचे नियोजन कराल. रात्रीचा वेळ कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे व्यतीत होईल