हल्लीची बदलती जीवनशैली माणसाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करत आहे.त्या पैकी १ समस्या म्हणजे उच्च रक्तदाब.या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्या वर गंभीर परिणाम होतो.
पथ्यपाणी सांभाळा: रक्त दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.आहारामध्ये फळं, पालेभाज्या,लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स,मीठाचा समावेश कमी करा.
मांसाहार कमी करा: मासे बोनलेस चिकन,रेड मीट टाळा. तसेच आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
फिजिकली अॅक्टिव्ह रहा: नियमित चालणे हा व्यायाम केलात तरी अनेक आजारांपा- सून दूर राहू शकता.थोडक्यात फिजिकली अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे.
वजन घटवणे: वाढणारे वजन उच्च रक्तदाबाच्या रूग्णां साठी त्रासदायक बाब आहे.त्या मुळे वेळीच आहार,व्यायामात बदल करून अतिरिक्त चरबी घटवा.
हे घटक कमी करा: अशांनी आहारातील खारावलेले पदार्थ, अळणी पदार्थांवर वरून मीठ टाकून खाणे टाळा.तसेच आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश वाढवावा.
मद्यसेवनावर नियंत्रण: उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेतल्या नंतर/आधी मद्यपान करत असलात तर त्यामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे हे करणे टाळा.
ताण-तणाव कमी करा: मानसिक धक्का बसेल/ तणाव अचानक वाढेल अशा परिस्थितींपासून शक्यतो दूर रहा. आवडत्या छंदामध्ये,योगाभ्यासामध्ये मन रमवा.
(सोशल मीडियावरून साभार)