1) लिम्बाचा रस आणि काकडीची पाने किंवा काकडीच्या चकत्या ज्या मुख लेपनात (फ़ेसपाक) लवगं आहे असा लेप किंवा मेथिची पाने रात्रभर लेपुन ठेवावीत व सकाळी चेहरा स्वच्छ धुवावा.
2) संत्राची साल पाण्यात भिजवुन संबध चेहरावर फ़िरवावी, त्याचा उपयोग होतो. दिवसभर चेहरावर तजेलता येण्यासाठी किमान एक लिटर पाणी प्यावे.
3) टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवानं दिसतो. मुरूम, सुरकुत्या, काळे डाग दूर होण्यास मदत मिळते.
4) गुलाबपाणी आणि कापूर यांचे मिश्रण एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. मुरूम जेव्हा होतील, त्यावेळी कापसाने हे मिश्रण चेहर्यावर लावा. हे केल्याने नक्कीच मुरूम कमी होतील.
5) संपूर्ण चेहर्यावर मुरूम पसरले असतील तर हळद आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहर्यावर लावा. त्याने चेहरा स्वच्छ होईल. कारण लिंबाची पाने रोगप्रतिकारक असतात.
6) उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते. प्रदुषणामुळे चेहरा काळा पडतो व नियमितपणे साफ न झाल्यामुळे मुरूम होतात. चेहर्याला स्वच्छ ठेवण्यासाठी बेसनात काकडीचा रस टाकून पेस्ट बनवून चेहर्याला लावल्याने चेहरा साफ व स्वच्छ होतो. हे फेस पॅकचे काम करतो.
7) मुलतानी माती पाण्यामध्ये टाकून तिची पेस्ट बनवा. नंतर ती चेहर्यावर लावा. मुलतानी मातीला दह्यात मिसळूनही लावू शकतो. मुरमांवर हाही एक जालीम उपाय आहे.
8) गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहर्यावरील छिद्रे खुली होतात आणि चेहरा साफ होतो. मुरूम व्हायला त्यामुळे अटकाव होतो.
9) तुळस व लिंबाच्या पानाची पेस्ट चेहर्यावर लावल्याने मुरूम होत नाही.
10) पाण्यात चंदनाची पावडर टाकून चेहर्याला लावल्यास थंडावा मिळतो व चेहर्यावर तेज येते.
11) गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट बनवून चेहर्यावर लावल्याने मुरूम कमी होतात. लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवानं दिसतो. मुरूम, सुरकुत्या, काळे डाग दूर होण्यास मदत मिळत.
12) त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण आठवड्यातून दोन/तीन वेळा आपण हा उपाय करू शकतो. बेसन, हळद आणि दूध मिक्स करून, त्यात साधे मीठ टाकावे आणि कोणत्याही तेलाचे 5/7 थेंब टाकावे. मिश्रण एकजीव करून चेहर्याला व मानेला लावावे. पेस्ट वाळल्यानंतर 10-15 मिनिटांनी काढून टाकावी.
13) बोलसमच्या फुलांची पेस्ट लावल्याने चेहर्यावरचे मुरूम कमी होतात.
14) कोरडी हळद लिंबाच्या रसासोबत एकत्रकरून चेहर्यास लावल्यास डाग जाण्यास मदत होते.
15) तेलकट चेहर्यावरील डाग़ जाण्याकरता चंदनाची पाउडर गुलाब पाण्यात एकत्र करून लाववी. हा उपाय विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फायद्याचा ठरू शकतो.
16) लिंबू , संत्राचे साल वाळवून त्याची पाउडर तयार करावी. गुलाबाच्या पाण्यात अथवा दह्यात एकत्रित करून डाग असलेल्या ठिकाणी लावल्यास निश्चित फायद्याचे ठरू शकते.
17) टमाट्याचा रस लिंबाच्या रसात एकत्र करून बाटली फ्रिजमध्ये ठेवावी. या रसाचा नियमित वापर चेहर्यावर लावल्यास काळे डाग हळू- हळू जाण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)