रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय 

आरोग्य

कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं कधीही फायद्याचं. याचमुळं अगदी सहजपणे आजाराशी दोन हात करता येतात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य अन्नपदार्थांचं सेवन आणि व्हिटॅमिन-C चा आहारातील समावेश. व्हिटॅमिन-C शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतो. संत्र आणि लिंबू यांव्यरिक्त इतरही अशी फळं आहेत, ज्यांमध्ये व्हिटॅमिन-C चं प्रमाण अधिक आहे.

आंबा: फळांचा राजा आंबा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतो. साधारण मध्यम स्वरुपातील आंबा १२२ मिलीग्राम व्हिटॅमिन-C देतो. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन-ए सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं.

पपई: सर्व ऋतू मध्ये मिळणारं हे फळ. पचनशक्ती सुधारण्यास अतिशय फायद्याचं आहे. या फळात व्हिटॅमिन-C मुबलक प्रमाणात असतं. एका पपईच्या सेवनाने ८८ मिलीग्रॅम पोषक तत्त्व मिळतात.

स्ट्रॉबेरी: व्हिटॅमिन-C चा चांगला स्त्रोत म्हणजे स्ट्रॉबेरी. या फळात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सिडंट असतात. एक कप स्ट्रॉबेरीच्या सेवनातून १०० मिलीग्राम व्हिटॅमिन-C मिळतं.

अननस: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्या सोबतच अननस हाडं मजबूत करण्यासाठीही फायद्याचा ठरतो. यामध्ये अनेक व्हिटॅमिन आहेत. एका अननसाच्या सेवनाने ७९ मिलीग्रॅम व्हिटॅमिन-C मिळतं.

किवी: एका किवी मध्ये जवळपास ८५ मिलीग्रॅम व्हिटॅमिन-C असतं. याशिवाय व्हिटॅमिन के आणि ई यांनी सुद्धा हे फळ परिपूर्ण आहे. आरोग्यासाठी हे फळ अतिशय लाभदायी आहे.

(सोशल मीडियावरून साभार)