१. सुकामेवा आणि बिया: बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता: शरीराला उष्णता देतात आणि उर्जावान ठेवतात. तिळाचे लाडू, गुळ-तिळाचे पदार्थ: पोषणमूल्याने भरपूर.
2) हळदीचे दूध: हळद व गरम दूध रोगप्रतिकारकशक्ती वाढवते आणि शरीराला आतून उबदार ठेवते.
३. हिरव्या पालेभाज्या: मेथी, पालक, सरसो: या भाज्या थंडीत सहज मिळतात आणि पोषणदृष्ट्या समृद्ध असतात.
४. गुळ: उष्णतेसाठी गुळाचा वापर करा. गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू किंवा पोळीसोबत गुळ खाणे फायदेशीर ठरते.
५. हिवाळी भाज्या आणि फळे: गाजर, बीट, सुरण: हिवाळ्यात उष्णता वाढवणाऱ्या भाज्या खाव्यात. संत्रे, आवळा, पेरू: व्हिटॅमिन C साठी उपयुक्त.
६. सूप्स आणि गरम पदार्थ: भाज्यांचे गरम सूप, मांसाहारी सूप यामुळे शरीराला उष्णता मिळते.
७. तूप आणि लोणी: रोजच्या आहारात तुपाचा समावेश करा. यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते.
८. धान्ये आणि भरडधान्ये: ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा आहारात समावेश करा. हे पचनाला सोपे असून उष्णता निर्माण करतात.
९. हिवाळी गोड पदार्थ: गुळपोळी, खजूर रोल, दुधी हलवा यासारखे पदार्थ उष्णतादायक असतात.
१०. औषधी चहा: आले, वेलची, दालचिनी घालून केलेला चहा शरीर गरम ठेवतो. थंडीत गरम, उष्ण व ताजे अन्न खाण्यावर भर द्या, आणि भरपूर पाणी प्या जेणेकरून त्वचा व शरीर हायड्रेट राहील.
(सोशल मीडियावरून साभार)