दही आणि मासे:- दही आणि मासे एकत्र खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. दही आणि मासे दोन्हींचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. दही थंड असतं तर मासे गरम असतात. दोन्ही सोबत खालं तर शरीराचं संतुलन बिघडतं. पचनासंबंधी, त्वचे संबंधी समस्या होतात.
दही आणि आंबट फळ:- दह्यात आंबट फळं जसे की, संत्री, लिंबू किंवा इतर सायट्रस फळांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. दही आधीच जरा आंबट असतं आणि त्यात आणखी आंबट मिक्स केलं तर याने अॅसिडिटी वाढते. यामुळे पचनासंबंधी, अॅसिडिटी आणि पोटात गॅस होण्याच्या समस्या होतात.
दही आणि दूध:- दही आणि दूध दोन्ही मध्ये पोषक तत्व भरपूर असतात. पण यांचं एकत्र सेवन करणं हे चुकीचं आहे. दही आणि दुधाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर अपचन, गॅस आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. कारण हे दोन्ही विरूद्ध आहार आहेत.
दही सेवन करण्याची योग्य पद्धत
दह्याचं सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून त्याचे पूर्ण फायदे शरीराला मिळावे. दह्यात काहीच मिक्स न करता खाणं अधिक चांगलं मानलं जातं. दह्यात काही गोड फळं मिक्स करून खाऊ शकता. जसे की, केळी आणि द्राक्ष. दही सामान्यपणे जेवणासोबत किंवा जेवणानंतर खावं याने पचन होण्यास मदत मिळते. तसेच रात्री दह्याचं सेवन अजिबात करू नये. कारण याने कफ होण्याचा धोका असतो, तसेच अपचनही होऊ शकतं. दही एक पौष्टिक आहार आहे. पण याचं सेवन योग्य पद्धतीने केलं जावं. काही पदार्था सोबत याचं सेवन नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे दह्याचं सेवन करताना वरील गोष्टींची काळजी घ्यावी.
(सोशल मीडियावरून साभार)