१) गरम पाणी नियमितपणे प्यायल्याने मेटाबॉलिक रेट म्हणजेच चयापचय क्रियेचा वेग वाढतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे अधिक चांगल्या पद्धतीने पचन होते.
२) गरम पाण्यासोबत अनेक औषधी घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. यामुळे औषधी शरीरात शोषून घेतलं जाण्याचं प्रमाण वाढतं.
३) चुकीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहार पद्धतीमुळे शरीरावर सूज येते. यालाच आपण इन्फ्लामेशन म्हणतो. ही सूज कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते. शरीरावरची सूज कमी झाली की आपोआपच वजनही आकड्यांच्या स्वरुपात कमी झाल्याचे दिसून येते.
गरम पाणी पिण्याबाबत हे गैरसमज टाळा…
१) गरम पाणी प्यायलं की सर्दी- खोकल्याचा त्रास कमी होतो, हा एक मोठा गैरसमज आहे. गरम पाणी हा काही त्यावरचा उपाय नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करणे गरजेचे आहे.
२) तसेच गरम पाणी प्यायलं की काहीही खाल्लं तरी वजन कमी होणारच, असं काहीही नाही. वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यासोबतच आहारात आणि जीवनशैलीमध्ये काही पोषक, सकारात्मक बदल करणं गरजेचं आहे.
३) गरम पाणी पिणं सगळ्यांच्याच तब्येतीला मानवणारं नसतं. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, मुळव्याधीचा त्रास आहे, अशा लोकांनी गरम पाणी पिऊ नये.