ब्रश करण्याची सगळ्यात चांगली वेळ कोणती, दातांचं दुखणं, पिवळेपणा अन् कीडही होईल दूर…

आरोग्य

दुर्गंधी होईल दूर:- रात्री झोपण्याआधी ब्रश न केल्याने आपल्या तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया जमा होतात. जर तुम्ही झोपण्याआधी ब्रश कराल तर बॅक्टेरियांना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण मिळणार नाही. याचा फायदा तुम्हाला असा होईल की, तुमच्या तोंडाची दुर्गंधी येणार नाही.

हिरड्या राहतील मजबूत:- रात्री ब्रश न केल्याने तोंडात बॅक्टेरिया जमा होतात आणि यामुळे दातांसोबतच हिरड्यांचं देखील नुकसान होतं. तोंडात जास्त बॅक्टेरिया असतील तर याने हिरड्या कमजोर होऊ शकतात. रोज रात्री ब्रश केल्याने हिरड्यांची मालिश होते आणि ते मजबूत राहतात.

चांगली झोप:- रोज रात्री ब्रश केल्याने तोंडाचं आरोग्य चांगलं तर राहतंच, सोबतच तुमच्या झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. रोज रात्री ब्रश केल्याने दात आणि हिरड्या निरोगी राहतात, ज्यामुळे कोणतीही वेदना किंवा अस्वस्थतेशिवाय तुम्हाला चांगली झोप येईल.

सडणार नाहीत दात:- रात्री जेव्हा आपण काही गोड खातो आणि ब्रश न करताच झोपतो तेव्हा दातांना कीड लागण्याची शक्यता जास्त असते. दातांमध्ये चिकटलेले किंवा अडकलेले कण बॅक्टेरिया खातात. अशात ॲसिडचं उत्पादन होतं, जे दातांचं नुकसान करतं. अशात दातांना कीड लागू नये यासाठी रोज रात्री ब्रश करावा.

 

(सोशल मीडियावरून साभार)