डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्या पूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात.
1) झोपण्या पूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील घाण, विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फ्रेश, टवटवीत वाटते. पेशींना तारुण्य, टवटवी मिळेल. परिणामी त्वचा तजेलदार, फ्रेश दिसेल.
2) रात्री पाणी प्यायल्याने हॉर्मोन आणि ऊर्जेचा बॅलन्स साधला जातो. त्यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि चांगली झोप येते.
3) झोपण्या पूर्वी पाणी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे शरीरात रक्तसंचार उत्तमरित्या होतो आणि हार्ट अटॅक सारख्या गंभीर समस्या पासून संरक्षण होते.
4) झोपण्या पूर्वी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच मेटाबॉलिझम सुधारते.
(सोशल मीडियावरून साभार)