मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषद २०२४-२५ या वर्षासाठी विधिमंडळाच्या विविध समित्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी विधान परिषद सदस्यांची नामनियुक्ती केली आहे. तशा प्रकारचे परिपत्रक विधिमंडळाने आज प्रसिद्ध केले आहे. विधिमंडळ कामकाजात महत्वाच्या अशा आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदी भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या आश्वासन समितीत आ. प्रविण दरेकर यांच्यासोबत सदस्य म्हणून विधानपरिषद आ. चित्रा वाघ, आ. धर्मगुरू राठोड, आ. कृपाल तुमाने, आ. विक्रम काळे, आ. अभिजीत वंजारी, आ. मिलिंद नार्वेकर, आ. अरुण लाड यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मंत्र्यांकडून सन्माननीय सदस्यांना आश्वासने दिली जात. या आश्वासनांची पूर्तता शासनाकडून केले गेले किंवा नाही, याची तपासणी ही समिती करत असते.