२७ मंडळांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, सर्वाधिक पावसाचा मारा कोणत्या जिल्ह्यात

महाराष्ट्र

संभाजीनगर: पावसाळा अजून सुरूही झाला नाही, पण मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने मराठवाड्यात दमदार हजेरी लावली आहे! बुधवारी (ता. २१) रात्री आलेल्या पावसाने मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांतील २७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक पावसाचा मारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची नोंद

फुलंब्री, आळंद – ८९.२५ मिमी

सिल्लोड, निल्लोड – ८७.७५ मिमी

सिल्लोड मंडळ – ८६.५० मिमी

फुलंब्री, वडोदबाजार – ८३ मिमी

गंगापूर, वाळूज – ६७ मिमी

उस्मानपुरा – ६७.७५ मिमी

कन्नड, पिशोर – ८०.२५ मिमी

फुलंब्री, पीरबावडा – ७६.५० मिमी

बाबरा – ६९.५० मिमी

जालना जिल्हा

भोकरदन, अन्वा – ८०.५० मिमी

जाफ्राबाद, वरुड – ६९ मिमी

घनसांगवी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, अंतरवली – प्रत्येकी ६७ मिमी

लातूर जिल्हा

औसा, मातोळा – ८१ मिमी

उजनी – ६९.५० मिमी

निलंगा, औराद – ८२.२५ मिमी

कासार बालकुंदा, कासारशिरसी – सुमारे ६९ मिमी

धाराशिव जिल्हा:

उमरगा, मुळज, उमरगा मंडळ – प्रत्येकी ६८.७५ मिमी

धाराशिव शहर – ७०.७५ मिमी

बेंबळी, पाडोळी, केशेगाव – प्रत्येकी ६९.५० मिमी

जागजी – ७८ मिमी

लोहारा, माकणी – ८१ मिमी