बालनिकेतन प्राथमिक विभागातील, चिमुकल्यांची आषाढी वारी आणि रिंगण…

महाराष्ट्र

बालनिकेतन विद्यालयात, अवतरली पंढरी 

कांदिवली: पारंपरिक वेषात नटलेले नटलेल्या वारकऱ्यांनी हातात, वीणा, टाळ आणि पालखी खांद्यावर घेऊन सावळ्या विठू रायाच्या नामाचा गजर करत दिंडी काढली. यां दिंडीत प्रमुख पाहुणे नाट्य अभिनेते प्रदीप कबरे, माई च्या अध्यक्ष शीतल करदेकर सहभागी झाले .शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री माने यांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे नियोजन आणि पालकांची मेहनत यां निघालेल्या दिंडीतून प्रकर्षाने दिसून आली.

कांदिवली पश्चिम येथील, बालनिकेतन प्राथमिक विद्यालय आणि मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया च्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने चिमुकल्यांची वारीचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १ ली ते ४ थी च्या एकूण १५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वारकरी च्या वेषातील सफेद कुर्ता आणि धोतर आणि मुलींनी नऊ वारी साडी घालून, कपाळावर सफेद, काळा बुक्का, गळ्यात तुळशी माळा, हातात, वीणा टाळ आणि चिपळ्या, मुखात विठ्ठलाचा गजर करत सकाळी१० वाजता दिंडी काढण्यात आली. सर्वप्रथम लेझीम पथक, त्यानंतर पालखी, विठ्ठल रखुमाई ,पालखीच्या आजूबाजूला, नामदेव, मुक्ताई ज्ञानेश्वर आणि वारकरी संप्रदाय, शिक्षक वर्ग अशा थाटात शाळेपासून ते महात्मा गांधी मार्गापर्यंत विठ्ठल नामाचा जय घोष करत, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी पुन्हा शाळेत आली. शाळेच्या आवारात येताच पालखी उभी करून मुलींनी गोल रिंगण केले. बाहेरील बाजूने मुलांनी रिंगण केले. शिक्षकांनी फुगड्या घालत घेर घेतला.

संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. जणू चिमुकल्यांच्या रुपाने पंढरीच अवतरली. मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्ष शीतल करदेकर आणिअभिनेते प्रदीप कबरे हे देखील रिंगणात सहभागी झाले,विठू माऊलीचा जयघोष, रिंगण, फुगड्या यामुळे, शाळेत, पंढरी अवतरली होती. कार्यक्रम नियोजनात माई चे उपनगर संघटन समन्वयक अनिल चासकर यांचा महत्त्वाचा सहभाग होता. दिंडीसाठी शिक्षिका अश्विनी गरुड, शुभांगी लोमटे, मनीषा घार्गे, विनीता मेस्त्री, रिद्धी पिंपळे,विद्या शेटके आणि सौ जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.