समाजकार्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे’ तर्फे खंडाळे गावच्या कार्यकर्त्याचा गौरव

महाराष्ट्र

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील खंडाळे गावचे तरुण आणि जिद्दी सामाजिक कार्यकर्ते अंकुश दिलीप नरवडे यांना समाजकार्य क्षेत्रातील उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्याबद्दल ‘ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे’ तर्फे राज्यस्तरीय सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हा मानाचा सन्मान पुण्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा येथे दिनांक १२ ऑक्टोबर रोजी आयोजित “माहितीचा अधिकार नागरिक समूह” च्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात देण्यात आला.

माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून समाजातील अन्यायाविरोधात लढणे, तसेच शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, न्यायिक आणि पर्यावरणीय प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे, या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे शासनामध्ये पारदर्शकता वाढण्यास हातभार लागला असून, त्यांचा लढाऊ आणि सकारात्मक दृष्टिकोन समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

या कार्यक्रमात ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आढाव, सचिव अमर कामठे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते अंकुश नरवडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यभरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या भव्य समारंभास उपस्थित होते.

संस्थेच्यावतीने अंकुश नरवडे यांना “आपण समाजसेवेचा हा प्रवास असाच पुढे चालू ठेवावा, हीच आमची मनःपूर्वक शुभेच्छा,” असा संदेश देण्यात आला.अंकुश नरवडे यांच्या या योगदानामुळे समाजकार्यातील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली आहे.त्यांच्या यशामुळे खंडाळे गाव तसेच शिरूर तालुक्याची मान आणखी उंचावली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत