फक्त 20 रुपयांत 4 महिने सुरू राहणार सिमकार्ड; कसे ते जाणून घ्या…

महाराष्ट्र

Jio, BSNL, Airtel अन् Vi ग्राहकांचं टेन्शन मिटलं, TRAI चे नवीन नियम

मुंबई: भारतातील अनेकजण दोन सिमकार्ड वापरतात एक मुख्य सिम कॉलिंग आणि डेटासाठी, तर दुसरे आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवले जाते. पण जुलै २०२४ मध्ये रिचार्ज दर वाढल्यामुळे हे दुसरे सिम रिचार्ज करून सक्रिय ठेवणे कठीण झाले आहे. यावर TRAI च्या नव्या नियमांनी तोडगा काढला आहे.

२० रुपयांत ४ महिने सक्रिय सिम

TRAI च्या नव्या नियमानुसार, जर सिम कार्ड ९० दिवसांपेक्षा जास्त काळ वापरले गेले नाही, तर फक्त ₹२० कापून ते पुढील ३० दिवसांसाठी सक्रिय ठेवता येईल. यामुळे कमी वापरल्या जाणाऱ्या सिमसाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही.

9० दिवसांनंतर काय होईल

जर सिम ९० दिवसांपर्यंत वापरले गेले नाही, तर कंपनी १५ दिवसांचा ग्रेस पीरियड देते. यादरम्यान, ग्राहक कस्टमर केअरशी संपर्क साधून किंवा कंपनीच्या स्टोअरला जाऊन सिम पुन्हा सक्रिय करू शकतात.

काय फायदे मिळणार

फक्त ₹२० मध्ये सिम सक्रिय ठेवता येणार.

दुसरे सिम निष्क्रिय होण्याची चिंता मिटणार.

सर्व प्रमुख कंपन्या – Jio, BSNL, Airtel, Vi यांच्याकडून ही सुविधा उपलब्ध

TRAI च्या नियमानुसार, “न वापरणे” म्हणजे जर ९० दिवसांपर्यंत सिमवर कोणत्याही प्रकारचे व्यवहार झाले नाहीत, तर ते निष्क्रिय मानले जाते. यात खालील व्यवहारांचा समावेश होतो.

येणारे आणि जाणारे कॉल्स

मेसेजेस

इंटरनेट डेटा सत्र

व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस (VAS)

कसा वापरायचा ₹20 चा प्लॅन

Jio ग्राहकांसाठी:

Jio ॲप किंवा MyJio वर ₹20 चा रिचार्ज निवडा.

Jio स्टोअरला भेट देऊन सिम सक्रिय करा.

BSNL ग्राहकांसाठी:

BSNL च्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरून रिचार्ज करा.

BSNL कस्टमर केअरशी संपर्क साधा.

Airtel ग्राहकांसाठी:

Airtel Thanks ॲपवरून ₹20 चा प्लॅन निवडा.

Airtel स्टोअरमध्ये भेट द्या.

Vodafone-Idea (Vi) ग्राहकांसाठी

Vi ॲप किंवा वेबसाइटवरून प्लॅन ॲक्टिव्हेट करा.

कस्टमर केअरवर कॉल करून मार्गदर्शन घ्या.