शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी एका शेतकऱ्याला ३६ वर्षीय शेतकऱ्याला मारहाण करत त्याच्या चारचाकी गाडीच्या काचा फोडत मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. याबाबत अतुल दिलीप पाचुंदकर (वय ३६, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी गौरव बोहाडे (रा. बोहाडेमळा, शिरुर), विजय भालेराव (रा. ढोकसांगवी, ता. शिरुर), कुणाल पाटील (सध्या रा. बनसोडे कॉम्प्लेक्स, रांजणगाव गणपती) आणि रोहित बहिरट (रा. न्हावरा, ता. शिरुर) यांच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

नेमक काय घडल…?

फिर्यादी अतुल पाचुंदकर हे दि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांचे चुलत भाऊ कानिफनाथ पाचुंदकर यांच्या उसाच्या शेतात ऊसाचे पीक पाहण्यासाठी गेले होते. तेथे काही वेळ थांबल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते खंडाळे मळा येथील स्वतःच्या उसाच्या शेताकडे जाण्यासाठी स्विफ्ट डिझायर कारने निघाले. त्यावेळी रस्त्याने जात असताना वकतुंड पार्क प्लॉटिंग परिसरापासून काही अंतरावर असलेल्या श्रीराम शंकर बनसोडे यांच्या वकतुंड कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यावर त्यांच्या कारसमोर एक दुचाकी रस्त्याच्या मधोमध उभी होती. त्यामुळे त्यांनी कार थांबवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना आपल्याला पुढे जायचे असल्याचे सांगत दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले.

किरकोळ कारण अन मारहाण…?

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी राखाडी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गाडीपुढे काहीतरी पडल्याचे सांगितले. मात्र, फिर्यादी कारमधून उतरुन पाहिले असता तेथे काहीही आढळले नाही. त्यामुळे आपण शेताकडे जाण्यासाठी निघालो असून दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले असताना टिंगल का करता असे फिर्यादी त्या युवकांना म्हणाले. त्यानंतर बनसोडे कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील एका कार्यालयातुन आणखी तीन जण धावत बाहेर आले आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यापैकी पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीने उद्धटपणे बोलत वाद घालत मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर इतर सहा जणांनी फिर्यादी यांना मारहाण केली. 

कारच्या काचा फोडल्या; सोन्याची चैनही गहाळ…

त्यानंतर त्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी फिर्यादी त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारच्या पुढील आणि मागील काचा दगड मारुन फोडल्याचे, तसेच कारच्या बोनेटचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गोंधळात त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील घड्याळही कुठेतरी पडुन गहाळ झाल्याचेही त्यांनी फिर्यादित नमूद केले आहे.

शिरुर; मालकाला संपवण्यासाठी रचलेल्या कटात कामगाराचा बळी; LCB आणि रांजणगाव पोलिसांकडुन सुपारीच्या कटाचा उलगडा

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

‘रांजणगावमधील तुझे दिवस संपले’ MIDC मध्ये HR मॅनेजरला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज 

रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत