balrangbhumi-pune-spardha

बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात चांगले कलाकार होणार: अभिनेते विजय पटवर्धन

महाराष्ट्र

नाट्यछटा स्पर्धच्या अंतिम फेरीत २९० स्पर्धेक दाखल
पुणे : बाल रंगभूमी परिषद, पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ रविवारी (ता. १३) भावे हायस्कूल येथे पार पडला. यावेळी विजेत्या मुलांना बक्षिसे देण्यात आली, अशी माहिती बाल रंगभूमी पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दिपक रेगे यांनी दिली.

सदर स्पर्धेची प्राथमिक फेरी 25 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 ग्रामीण विभाग आणि शहर विभाग अशा दोन विभागात आणि चार गटात सुरु झाली होती. प्राथमिक फेरीत पुणे जिल्ह्यातील शहर व सर्व तालुक्यातील 2200 मुलांनी यामध्ये सहभाग भाग घेतला. पुणे जिल्ह्यातील विविध 25 केंद्रावर प्राथमिक फेरी झाल्यानंतर 2200 मुलांमधून 290 स्पर्धक अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होते. या 290 मुलांची अंतिम फेरी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजे पर्यंत घेण्यात आली, अशी माहिती उपाध्यक्ष अरुण पटवर्धन व नारायण करपे यांनी दिली

अभिनेते सुनील गोडबोले, अतुल कासवा, केतन क्षीरसागर, अर्चना कुबेर, विजय पटवर्धन, दिपाली निरगुडकर, राज कुबेर, आशुतोष वाडेकर, मधुरा टापरे, आसावरी नितीन, आशुतोष नेर्लेकर आदी मान्यवरांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सायंकाळी साडेचार वाजता बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. बक्षीस समारंभाच्या वेळी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विसचे प्रा. डॉ. देवानंद शिंदे, भाषा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्वाती राजे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये नट श्रेष्ठ अविनाश देशमुख यांचे चिरंजीव चैतन्य देशमुख , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेते सुनील गोडबोले, निळू फुले यांच्या भगिनी प्रमिलाताई ठाकूर, निळू फुले अकादमी चे विश्वस्त सुरेश देशमुख, विजय पटवर्धन, सतीश लोटके, तळेगांव दाभाडे नाटय परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, उदय लागू माजी अध्यक्ष बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्हा, सत्यजित धांडेकर, सुहास जोशी, समीर हंपी, प्रदीप आडगावकर, कोषाध्यक्ष नाटय परिषद शिरूरचे बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.

कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विस चे प्रोफेसर डॉ. देवानंद शिंदे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्पर्धकांचे, शिक्षकांचे, पालकांचे आणि आयोजकांचे कौतुक केले. भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती राजे यांनी मुलांना न ऐकलेली गोष्ट वाचून दाखवली. मराठी भाषेच्या उच्चारावरती विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. बालनाट्य स्पर्धेत मुलींचा सहभाग लक्षणीय असून आपण चांगले प्रेक्षक झालो तर भविष्यात चांगले कलाकार होणार होऊ. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील नैसर्गिक अभिनयावर लक्ष केंद्रीत केल्यास यश नक्की मिळेल, असे मत अभिनेते विजय पटवर्धन यांनी मांडले. नाट्य अविष्कारातून व्यक्तिमत्व विकास होतो. विद्यार्थ्यांच्या अभिनय वृत्तीला पालकांनी प्रोत्साहन द्यावे. मानवी संवेदना जागृत ठेवून काम केल्यास जीवनात योग्य दिशा मिळते, असे मत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्ह्यातील शहर व ग्रामीण 25 केंद्रातून जवळपास 2200 मुलांनी नाट्यछटा सादर केल्या. कोणत्याही संस्थेची यशस्विता संस्थेच्या कार्यकारी सदस्यांवर अवलंबून असते. किल्ल्याची तटबंदी भक्कम तर किल्ला सुरक्षित त्याप्रमाणे कार्यकारणीचे अचूक नियोजन कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे बाल रंगभूमीच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक व केंद्रप्रमुखांचे आभार मानले.

पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रदीप आडगावकर यांच्या वतीने सर्व केंद्र प्रमुखांना बाल साहित्य विषयाची नऊ पुस्तके असलेला पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. जेष्ठ पत्रकार मिहीर थत्ते यांच्या वतीने प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना संगणक विषयक माहिती असलेल्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्याध्यक्ष दीपक रेगे, उपाध्यक्ष – अरुण पटवर्धन, नारायण करपे, प्रमुख कार्यवाह देवेंद्र भिडे, सहकार्यवाह प्रकाश खोत, जतीन पांडे, खजिनदार सत्यम कोठावदे, सहखजिनदार संध्या धुमाळ, कार्यकारिणी सदस्य प्गिरीश भुतकर, सुधीर कदम, अनुराधा काळे, प्रभा काळे, स्मिता मोघे, स्वीकृत सदस्य मुग्धा वडके, सुश्मिता पगी, अभिजीत इनामदार, राजेंद्र बोधे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र भिडे यांनी तर आभार दिपक रेगे यांनी मानले. आर्यन्स वर्ल्ड स्कूल संस्थापक मिलिंद लडगे, अर्चना कुबेर, अर्चना यादव वैशाली पोतदार , सुनंदा लंघे हे कार्यक्रमासाठी उपस्थीत होते. निळू फुले यांच्या भगिनी प्रमिलाताई ठाकूर यांनी बाल रंगभूमीच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांचा सत्कार केला.
अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा व सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले .

अंतिम फेरी निकाल (शहर विभाग)
गट क्रमांक १ (पहिली- दुसरी)
प्रथम क्रमांक : व्रिहा काळे
द्वितीय क्रमांक : नया कुलकर्णी उत्तेजनार्थ : आरव साबणे

गट क्रमांक २(तिसरी -चौथी)
प्रथम क्रमांक : मल्हार तांबे
द्वितीय क्रमांक: आर्या जगताप
तृतीय क्रमांक: अक्षरा जोशी
उत्तेजनार्थ १ : सानवी कदम
उत्तेजनार्थ २ : तनिष्का बोकील

गट क्रमांक ३ (पाचवी, सहावी सातवी )
प्रथम क्रमांक : आराध्या लोंढे
द्वितीय क्रमांक : मधुजा मीठभाकरे
तृतीय क्रमांक: अर्चित थत्ते
उत्तेजनार्थ 1: अर्णव लहूशंकर
उत्तेजनार्थ 2 : अरण्या जगताप
उत्तेजनार्थ 3 : अनुष्का अभंगे

गट क्रमांक ४ (आठवी- नववी)
प्रथम क्रमांक : अक्षरा जाधव द्वितीय क्रमांक : तक्षिकअभ्यंकर

ग्रामीण विभाग
गट क्रमांक १ (पहिली -दुसरी)
प्रथम क्रमांक : गायत्री शेळके (महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव गणपती)
द्वितीय क्रमांक: शम्या चौरी
तृतीय क्रमांक : अनुश्री सुरवसे ज्ञानगंगा विश्वविद्यालय बाबुराव नगर शिरूर

उत्तेजनार्थ १ : युगंधर जाधव
उत्तेजनार्थ २ : मनस्वी गावडे

गट क्रमांक २ (तिसरी -चौथी)
प्रथम क्रमांक: सानवी शेंडगे
द्वितीय क्रमांक: श्रेया हेगडे
तृतीय क्रमांक: नक्षत्रा पटवर्धन (आर .एम .धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर)
उत्तेजनार्थ १: सृष्टी बागल
उत्तेजनार्थ २: युगा वाघचौरे
उत्तेजनार्थ ३: श्रीजा गावडे

गट क्रमांक ३ (पाचवी ,सहावी)
प्रथम क्रमांक : श्रद्धा साळुंके
द्वितीय क्रमांक: समीक्षा घोडके
तृतीय क्रमांक : स्वरा गाडे
उत्तेजनार्थ १: आयुष चव्हाणके
उत्तेजनार्थ २: काव्यंजली महाडिक स्वामी विवेकानंद विद्यामंदिर उरुळी कांचन

गट क्रमांक ४ (आठवी नववी)
प्रथम क्रमांक : वैष्णवी सिंदनकर ज्ञानगंगा विश्वविद्यालय बाबुराव नगर शिरूर
द्वितीय क्रमांक : सिद्धी भिसे विद्याधाम प्रशाला शिक्रापूर
तृतीय क्रमांक : अर्णव देशमुख
उत्तेजनार्थ १: ऋतुजा गावडे
उत्तेजनार्थ २: तृप्ती चौधरी नी(स्वा.से.आर.बी.गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे)

गट क्रमांक 2
1) श्रेया हेगडे, पैसाफंड प्राथमिक शाळा तळेगाव दाभाडे, मावळ
गट क्रमांक 3
1) समीक्षा घोडके
2) आयुष चव्हाणके, नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे, मावळ
3) श्रद्धा न्यानेश्वर साळुंखे, राजा रघुनाथराव विद्यालय भोर

बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी दिपाली शेळके यांची निवड

नाट्यछटा स्पर्धेमध्ये सरदवाडीत तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग!

रांजणगाव गणपती येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात