दहीहंडी उत्सवानिमित्त छ. संभाजीनगरातील वाहतुकीत बदल; ‘हे’ आहे पर्यायी मार्ग

महाराष्ट्र

संभाजीनगर: उद्या, शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी होणार असून, गर्दी टाळण्यासाठी संध्याकाळी ४ ते रात्री १० या वेळेत काही प्रमुख चौक वाहतुकीसाठी बंद राहतील.  खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा.

वाहतुकीसाठी बंद असलेले प्रमुख चौक

टीव्ही सेंटर चौक: साक्षी मंगल कार्यालय, हडको कॉर्नर, जिजाऊ चौक, आयपी मेस कडून येणारी वाहतूक बंद राहील

कॅनॉट प्लेस: चडीएफसी बँक चौक, बॉम्बे स्टेशनरी, वायझेड फोर्ड शोरूम कडून येणारी वाहतूक बंद राहील

जानन महाराज मंदिर चौक: पटियाला बँक, जवाहरनगर पोलीस स्टेशन, आदिनाथ चौकातून वाहतूक बंद राहील

कोकणवाडी चौक: पंचवटी चौक, वेदांतनगर कडून येणारे रस्ते बंद राहील

गुलमंडी परिसर:  पैठण गेट, औरंगाबाद बुक डेपो कडून येणारी वाहतूक बंद राहील

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

टीव्ही सेंटर चौकासाठी: कलेक्टर ऑफिस – एन-12, हडको कॉर्नर – एन-12 – साठे चौक – दिल्ली गेट, सेव्हन हिल्स – सेंट्रल नाका – बळीराम पाटील स्कूल

कॅनॉट प्लेससाठी: कॅनॉट प्लेस एन-1 चौक येथून नोमीट नॉन हॉटेल चौकाकडे

गजानन महाराज मंदिर चौकासाठी: पटियाला बँक – विजयनगर – गजानन कॉलनी – रिलायन्स मॉल, जवाहरनगर पोलीस स्टेशन – डॉ. हेडगेवार हॉस्पिटल मागील रस्ता – त्रिमूर्ती चौक

कोकणवाडी चौकासाठी: पंचवटी चौक – रेल्वे स्टेशन मार्गे, उस्मानपुरा – चुन्नीलाल पेट्रोल पंप, देवगिरी कॉलेज – आयटीआय – पीरबाजार – उस्मानपुर