ठाणे: महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस श्री. पाटील यांच्यासह तहसिलदार रेवण लेंभे व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.