शिरुर तालुक्यातील 33 शाळांचा इयत्ता 10 वीचा शंभर टक्के निकाल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ३३ शाळांचा इयत्ता दहावीच्या मार्च 2024 च्या परीक्षेत ऑनलाईन निकाल 100 टक्के लागला आहे. त्यात शिरुर शहरातील 5 शाळांचा समावेश आहे. तर शिरुर तालुक्याचा एकुण निकाल 97.43 टक्के लागल्याची माहिती शिरुरचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. शिरुर तालुक्याचा दहावीचा एकुण निकाल 97.43 टक्के लागला आहे. या परीक्षेत 87 माध्यमिक शाळेचे एकुण 6543 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6375 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये तालुक्यातून विशेष श्रेणीत 2305, प्रथम श्रेणीत 2339, आणि द्वितीय श्रेणीत 1405 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर आणि शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम यांनी दिली आहे.

 

शिरुर तालुक्यातील शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाणे 

1)श्री गुरुदेव दत्त विद्यालय संविदणे 2) संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल, मुखई 3) श्री . भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, करडे, 4) न्यू इंग्लिश स्कूल, भांबर्डे 5) न्यू इंग्लिश स्कूल, इनामगाव, 6) श्री नागेश्वर विद्यालय, निमोणे, 7) श्री. महर्षी शिंदे हायस्कूल, आंबळे, 8) श्री सदगुरु कृपा विद्यालय, नागरगाव, 9) श्री गुरुनाथ विद्यालय, वडनेर खुर्द, 10) कालिकामाता माध्यमिक विद्यालय, वाघाळे, 11) श्रीमती बबईताई टाकळकर आश्रम शाळा, निमगाव म्हाळुंगी 12) तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय, निर्वी, 13) न्यू इंग्लिश स्कूल, उरळगाव, 14) न्यू इंग्लिश स्कूल पिंपळसूटी, 15) मा. बापूसाहेब गावडे विद्यालय, म्हसे बुद्रुक, 16) हनुमान माध्यमिक विद्यालय, निमगाव भोगी, 17) आयेशा बेगम उर्दू हायस्कूल, शिरुर, 18) आदर्श विद्यालय, वरुडे, 19) जय मल्हार माध्यमिक विद्यालय, चिंचोली मोराची, 20) शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, चिंचणी, 21) एकता विद्यालय, करंजावणे, 22) आर एम धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरुर, 23) सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक विद्यालय, कासारी, 24) फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट, कोरेगाव भीमा, 25) शिवाजी विद्यालय गोलेगाव, 26) श्री पद्मिनी जैन इंग्लिश स्कूल, पाबळ, 27) विजयामाला इंग्लिश मीडियम स्कूल, शिरुर, 28) आर एम धारिवाल सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, कोंढापुरी, 29) अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल, 30) ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरुर, 31) ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर तळेगाव, 32) डी इ एस इंग्लिश मीडियम स्कूल, बाबुरावनगर, शिरुर, 33) अक्षरनंदन गुरुकुल इंग्लिश मीडियम, रांजणगाव गणपती,

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात