सरपंच रेश्मा पिंगळे यांच्या पाठपुराव्याला यश
शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता. शिरूर) येथील भिल्ल आदिवासी नागरिकांच्या ११ घरांसाठी जागतिक आदिवासी दिना निमित्ताने हक्काची जागा तब्बल ६० वर्षानंतर तेहि ७/१२ उताऱ्यासह पंचायत समिती, महसुल प्रशासणाच्या पुढाकाराने गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते देण्यात आली. सदर ठिकाणी ११ आदिवासी नागरिकांना आगामी काळात हक्काची घरकुले मिळवून देण्याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी उपस्थित आदिवासी भिल्ल समाज नागरिक,ग्रामस्थांना दिले.
या कार्यक्रमास सरपंच रेश्मा पिंगळे,उपसरपंच रामदास चव्हाण,शिरूर पंचायत समीतीच्या माजी सदस्या डॉ.कल्पना पोकळे,ग्रामपंचायत अधिकारी स्वप्निल कवडे,तलाठी रामदास आरदवाड,सामाजिक कार्यकर्ते शांताराम पानमंद, वैभव शेलार, पत्रकार बांधव,आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे उपस्थित होते.
फाकटे गावातील वर्षानुवर्षे दुर्लक्षित व प्रलंबीत प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या गावच्या सरपंच रेश्मा नितीन पिंगळे यांनी विविध विकासकामे गतिमानपने सोडण्याचे कार्य सुरू ठेवले असून गावातील आदिवासी भिल्ल समाजाला राहण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाकडे जागा मिळावी म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.या कामी ग्राहक पंचायतीचे तालुका प्रमुख अरुणकुमार मोटे यांचा पाठपुरावा देखील महत्वपूर्ण ठरला.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना या ११ आदिवासी बांधवांना लवकरात लवकर हक्काची घरकुल नक्कीच मिळावीत या कामी प्राधान्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम गटविकास अधिकारी महेश डोके यांनी उपस्थित ग्रामस्थ आदिवासी बंधूना आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सामाजिक कार्यकर्ते नितीन पिंगळे,समाधान केदारी यांनी केले.