शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत शिरूर तालुक्यात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली सेवा देण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात शिरूर,टाकळीहाजी,मलठण, कोरेगाव भिमा, वडगाव रासाई, रांजणगाव, तळेगाव ढमढेरे, निमोणे, पाबळ, न्हावरा या एकूण १० मंडळांमध्ये शिबिरे भरवून १८५० पात्र लाभार्थ्यांना तत्काळ सेवांचा लाभ मिळाला आहे.
तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यात विविध मंडलात घेण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना जलद व सुलभ पद्धतीने सेवा पुरविण्यात आल्या. त्यामध्ये
महसूल विभागात १४३२ अर्ज आले होते. ते सर्व अर्ज मंजूर व सेवा पुरविण्यात आल्या आहेत.
पुरवठा विभागामार्फत ३५ लाभार्थ्यांना,
कृषी विभागामार्फत : ८४ लाभार्थ्यांना,
भूमी अभिलेख विभागामार्फत: ९ लाभार्थ्यांना,
आरोग्य विभागामार्फत: ७० लाभार्थ्यांना,
पशुवैद्यकीय विभागामार्फत: ५१ लाभार्थ्यांना,
पाटबंधारे विभागामार्फत: १ लाभार्थ्यांना,
वन विभागामार्फत: २२ लाभार्थ्यांना,
पंचायत समिती विभागामार्फत: १३४ लाभार्थ्यांना,
सामाजिक वनीकरण विभागामार्फत: ३ लाभार्थ्यांना,महिला व बालकल्याण विभागामार्फत: ३ लाभार्थ्यांना,महावितरण विभागामार्फत: ६ लाभार्थ्यांना असे एकुण या शिबिरांद्वारे १८५० लाभार्थ्यांना आवश्यक सेवा, प्रमाणपत्रे, मंजुरी तसेच विविध योजनांचा लाभ थेट मिळाला आहे.
या अभियानामुळे नागरिकांना शासनाच्या कार्यालयीन दारोदारी फिरावे लागले नाही, तर त्यांच्या हक्काच्या सेवा वेळेत आणि पारदर्शकपणे मिळाल्याचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले आहे. महसूल सप्ताहातील हा उपक्रम शिरूर तालुक्यात विशेष कौतुकास पात्र ठरला असून नागरिकांनी याला उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला आहे.