मित्रांनो हेलपाटा ही कादंबरी ग्रामसेवक तानाजी धरणे सरांनी लिहिली आहे. ही कादंबरी हृदयस्पर्शी संघर्षमय कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये लहानपणी घडलेले प्रसंग, अनुभव या कादंबरीत सांगितलेले आहेत. हेलपाटा ही कादंबरी वाचताना प्रत्यक्षात चित्रच डोळ्यासमोर येऊन उभ राहतं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, असे या कादंबरीत लिखाण केले आहे. आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी केलेली कसरत या कादंबरीत सांगितलेली आहे.
ही कादंबरी वाचताना यातून आपल्याला काहीतरी बोध नक्कीच मिळतो काहीतरी घेण्यासारखे आहे. मी कादंबरी वाचत असताना काही अनुभव आले, माझाही भूतकाळ मला आठवू लागला. खरंच पूर्वीची माणस खूप ग्रेट होती त्यांचे राहणीमान, चालीरीती, त्यांची घरं, त्यांचे आचार विचार, त्यांची बोलणी असे अनेक माणसांचे गुण आपल्या मनाला भुरळ घालताना दिसतात. आज आपल्याला एखादा म्हातारा माणूस भेटला ना त्याची बोलण्याची भाषाच वेगळी बाळा, राजा, वाघा, साहेब, असे अनेक शब्द लावून आपल्याला आवाजाव बोलतात त्यांच्या बोलण्यात गोडवा दिसतो. हे मी अनुभवल आहे.
पूर्वीची माणसे खूप साधेपणाने राहत होते. त्यांच्या जेवनाचा बेत खूप मनाला लागणार होता. पूर्वी माणसे चुलीवर भाकर, बेसन आणि हिरव्या मिरचीचा रगडा करून खात असे आणि आत्ताची माणसे परिपकवान खाताना दिसतात. पूर्वीच्या माणसांना परिपकवान खाण्याची सवय नसते.माणसाने जीवनात कोणत्या गोष्टी अनुभवाव्या व संघर्ष कोणत्या गोष्टीचा करावा यात आपल्याला अनुभवायला मिळतो. आपण जीवन जगत असताना खूप संकटे, दुःख येतात. त्या संकटांवर मात करावी, आपल्याला संघर्ष करावा लागतो संघर्ष केल्याशिवाय सुखाचे दिवस येणार नाही म्हणून आपण जीवनात नेहमी संघर्ष केला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या जीवनात संघर्षाला खूप महत्त्व आहे. संघर्ष केल्याने माणूस घडतो आणि माणूस घडला की मग समाज घडतो ज्याने दुःखच पाहिले नाही त्याला सुखाची किंमत काय करणार, सुख म्हणजे काय हे काय करणार. माणसाने संघर्ष केलाच नाही, तर खरे जीवन कसे कळणार म्हणून माणसाला खरे वळण द्यायचे असेल तर जीवनात संघर्ष हा हवाच आपल्याला आलेले दुःख पचवण्याची सवय झाली पाहिजे.खरंच दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसणार नाही अशी म्हण उमगली पाहिजे. आपण कादंबरी वाचताना पाना- पानावर या जीवनाचा प्रत्यय येत रहातो .आपण जीवन जगताना येणाऱ्या आयुष्यात विनातक्रार भोगत राहायचं नाही नशिबाला दोष द्यायचा नाही शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहायचं जीवनात किती संकटे आले तरी मागे हटायचं नाही एक ना एक दिवस आपला विजय नक्कीच होणार असे कादंबरीत वाचताना आपल्या अंगावर मनभर मास चढते , यातील अनुभव जीवनात क्षणोक्षणी जाणवतात.
या कादंबरीमध्ये धरणे सरांनी सांगितल आहे जगणं काय असतं…! संकटे कशी असतात…! प्रत्येकांवर प्रसंग कसा येतो…! याचे वर्णन केवळ शब्दात करणं कठीण आहे ” प्रत्येक बाप कुटुंबासाठी एवढा खस्ता खात असतो की पोरांनी आपल्या चामडीचे जोडे करून बाप्पाला घालायला दिले तरी बापाचे ऋण फिटणार नाही ” असे यात सांगितलेले आहे. ही कादंबरी मी पूर्ण वाचली खूप अप्रतिम लिखाण केलं आहे प्रत्येकाने ही कादंबरी वाचली पाहिजे तरच जीवनाचा खरा अनुभव आपल्याला येईल. तर सर्वांचाच अनुभव जागा होतो आणि प्रत्येक व्यक्तीने जीवन कस जगावं हे यात सांगितल आहे. आपण हुशार असतो पण आपल्या घरची परिस्थिती हलाकीची असल्याने आपण शिक्षण घेऊ शकत नाही असं म्हणण्यापेक्षा आपल्यात शिकण्याची जिद्द आसली पाहिजे, हे यात दाखवलं आहे.
प्रत्येकाने आवर्जुन वाचावी अशिच आहे कादंबरी ‘हेलपाटा’
– कवी मंगेश गंगाधर सावंत, बीड (आंबाजोगाई)
मो. 9527046634, 9356557485