ईव्हीएम सापडल्याने खळबळ! बार-हॉटेलच्या आवारात मशिन कशी? प्रशासनाकडे स्पष्टीकरण

मोहोळ: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी संपूर्ण राज्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे निवडणूक प्रशासनाची झोप उडाली आहे. मोहोळ शहराजवळील एका खाजगी बार व हॉटेलच्या परिसरात चक्क ईव्हीएम मशिन आढळून आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मशिन जमा करण्याची घाई […]

अधिक वाचा..

बारामती तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान! प्रशासन सज्ज

बारामती: बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गटासाठी मतदान ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर मतमोजणी जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे ९ फेब्रुवारीला होईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम २०२६ अंतर्गत, तालुका निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी […]

अधिक वाचा..

ZP निवडणूक काळात घोड धरणात वाळू माफिया सक्रिय अन प्रशासन मात्र निष्क्रिय…?

शिंदोडी (तेजस फडके): सध्या शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु असुन महसूल व पोलिस प्रशासन आचारसंहिता, बंदोबस्त आणि राजकीय कार्यक्रमांत इतके गुरफटले आहे की घोड धरण थेट वाळू माफियांच्या ताब्यात गेल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. निवडणूकीच्या रणधुमाळीत प्रशासन गाफील असल्यामुळे घोड धरणात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. तरीही “प्रशासन जाणीवपुर्वक […]

अधिक वाचा..

प्रशासनावर मजबूत पकड आणि वेळेची काटेकोर शिस्त ही अजित पवारांची ओळख होती

उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा मुंबई: उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ व लोकप्रिय नेते मा. अजितदादा पवार यांच्या आज सकाळी झालेल्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विश्वास बसणार नाही असा क्षण असून राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. […]

अधिक वाचा..

केज शहरात अतिक्रमणांवर मोठी कारवाई; प्रशासन ऍक्शन मोडवर

केज: केज शहरातील रस्त्यांवर शासकीय जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांच्या मुजोरीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ऍक्शन मोडवर आले आहे. यासंदर्भात काल वरिष्ठ पातळीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, केज शहरातील विविध भागांमध्ये शासकीय जागेवर झालेले सर्वच अतिक्रमण सरसकट हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची […]

अधिक वाचा..

भाजपच्या भ्रष्ट, अपयशी कारभाराला जनता कंटाळली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या सांगता सभेतून भाजपवर काँग्रेसचे टीकास्त्र चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज शहरातील विविध प्रभागातून रोड शो करीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून भाजपविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका करत म्हटले की, देशासह संपूर्ण राज्यात व महानगरपालिकेत भाजपने विकासाच्या नावाखाली फक्त लुटीचे राजकारण केले. रस्ते नाहीत, पाणी नाही, स्वच्छता नाही […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रोहित्र चोरी सुरुच; प्रशासन झोपेत, शेतकरी उघड्यावर!

शिरुर (नितीन थोरात): शिरुर तालुक्यातील आमदाबाद परिसरात पुन्हा एकदा वीज रोहित्र चोरीचा प्रकार घडला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. काही दिवसांपुर्वी याच गावात तीन रोहित्र फोडले गेले होते. तरीही एकही आरोपी जेरबंद न झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढतच आहे. तालुक्यात रोहित्र चोरी संघटित टोळीमार्फत सुरु असलेले खुले आव्हान बनले आहे. ऐन शेतीच्या हंगामात […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील महसूल प्रशासनातील कर्मचारी सामुहीक रजेवर

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी मावळ तालुक्यातील मुरूम उत्खनन प्रकरणी तहसीलदार, मंडल अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाईकेली आहे. त्यामुळे महसूल विभागात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट राज्य ग्राम महसुल अधिकारी व मंडल अधिकारी संघ,शारवा शिरूर यांनी विनाकारण व अन्यायकारक पद्धतीने करण्यात आलेल्या कारवाईमुळे दि. १५ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने वाळू माफियां किंवा मुरुम माफिया यांच्या विरोधात दिलेली गोपनीय माहिती आणि तक्रारदाराच नाव संबंधित वाळू किंवा मुरुम माफिया पर्यंत सोयीस्करपणे पोहोचवायचं काम तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. शासनाच्या नियमांनुसार तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे […]

अधिक वाचा..

उत्कृष्ट छायाचित्रांना ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मिळणार गौरव…

छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत १७ सप्टेंबर ठाणे: ठाणे जिल्ह्याचे सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने एक अनोखी ‘छायाचित्रण स्पर्धा २०२५’ आयोजित केली आहे. जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता, वन्यजीव, लोकजीवन आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व हौशी,नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार […]

अधिक वाचा..