शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडी करून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर परिसरातील दुकान फोडून दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले सुमारे १ लाख रुपये किमतीचे १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणाऱ्या तीन सराईत आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. डायल ११२ पथकाची सतर्कता, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रामदास आनंदराव सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

जेसीबीच्या काचा फोडून १० हजारांची रोकड लंपास; चोरी की वैयक्तिक वाद

शिरूर (अक्षय टेमगिरे): देविदास बाळासाहेब सातकर यांच्या मालकीच्या उभ्या असलेल्या जेसीबी मशीनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून आतील रोकड चोरून नेल्याची घटना १९ जूनच्या मध्यरात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबी मशीनच्या काचा फोडून मशीनमध्ये डिझेलसाठी ठेवलेली सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित मालकाचे आर्थिक नुकसान झाले […]

अधिक वाचा..

रोहित्र फोडून तांब्याच्या तारांची चोरी; अनोसेवाडी अंधारात

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील अनोसेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी विजेचे रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला असून शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, शनिवार (दि 28) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रोहित्राचे बाह्य आवरण फोडून आतमधील तांब्याच्या तारा आणि इतर […]

अधिक वाचा..

न्हावरेत किराणा दुकान फोडून धाडसी चोरी; चोरटा सिसीटिव्ही मध्ये कैद 

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात गुरवार (दि 26) मध्यरात्रीच्या सुमारास किराणा दुकान फोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन येळे यांच्या कोकरे किराणा स्टोअर या दुकानाचे छतावरील पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि रोकड लंपास करून पसार झाला. संपूर्ण प्रकार दुकानातील सिसीटिव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. याबाबत मिळालेल्या […]

अधिक वाचा..

इंडिगो क्रायसिसवर पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; मक्तेदारी मोडून काढण्याची मागणी

मुंबई: इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह लाखोंचा ऐवज चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील स्मशानभुमीसमोर रांजणगाव-सोनेसांगवी रस्त्याच्या कडेला घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप फोडून तब्बल ५ लाख २९ हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड पळविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात निलम पांडुरंग तोडकर (वय ४८) यांनी फिर्याद दिली असुन त्यांचे कुटुंब दि २४ नोव्हेंबर […]

अधिक वाचा..

माय-लेकाची घरात घुसून हत्या

पंढरपुर: पंढरपुरातून एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पंढरपूरच्या कुंभार गल्लीत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची निर्घृण हत्या राहत्या घरात करण्यात आली आहे. एकाच वेळी झालेल्या डबल हत्येने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपूरच्या कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार […]

अधिक वाचा..

मलठण गावात बंद घर फोडून प्रपंचिक साहित्य चोरीस

शिरूर तालुक्यातील मलठण येथील घटना  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीतील निमगाव दुडे-शिंदेवाडी रोडलगत गट नंबर 1186/1 मधील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ३७,५००/- रुपये किमतीचे घरगुती साहित्य चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्मिता शाम […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात बंद घर फोडून दागिने चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना (दि २४) मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५ ३० या वेळेत घडली. माधुरी नारायण तरटे (वय 35), रा. […]

अधिक वाचा..

पराभव दिसत असल्याने घातपाताची शक्यता, पत्रकाराला घरात घुसून धमकी 

मुंबई: मागील पाच वर्ष जनतेला वाऱ्यावर सोडणारे आमदार आदित्य ठाकरे पुन्हा निवडून येण्यासाठी उबाठा गट वरळीत घातपात शकतो, असा खळबळजनक आरोप शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज केला. पत्रकाराला घरात घुसून धमकी देणे, विविध वस्तू देऊन मतदारांवर दबाव टाकण्याचे प्रकार वरळीत सुरु असल्याचे पावसकर म्हणाले. वरळीतील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते […]

अधिक वाचा..