मलठण गावात बंद घर फोडून प्रपंचिक साहित्य चोरीस

क्राईम शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील मलठण येथील घटना 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीतील निमगाव दुडे-शिंदेवाडी रोडलगत गट नंबर 1186/1 मधील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ३७,५००/- रुपये किमतीचे घरगुती साहित्य चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी स्मिता शाम गलांडे (वय ४६ वर्षे, रा. तुळजाभवानी नगर, खराडी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ३० जून २०२५ रोजी दुपारी ३.३० वा. ते १ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.३० वा. या दरम्यान त्यांच्या मालकीच्या बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडले आणि घरात प्रवेश करून खालील प्रमाणे प्रपंचिक साहित्य चोरले:

अंदाजे ५,०००/- रु.किंमतीची किचन मधील स्टील भांडी, पिजेन कंपनीची गॅस शेगडी व एच. पी. गॅस सिलिंडर,३०,०००/- रु.किंमतीचा लाकडी किंग साईज बेड, गादी, उशी, चटई, बेडशीट, ब्लँकेट, खिडक्यांचे पडदे व इलेक्ट्रिक वायर, स्विच,रु.५००/- किंमतीचा हिटर कॉईल, रु.१,०००/- किंमतीचा एलईडी आरसा,रु.१,०००/- किंमतीच्या दोन एलईडी मरकरी लाइट्स इत्यादी वस्तू चोरीला गेल्या आहेत. सदर चोरीबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यातआला असून गुन्ह्याचा तपास शरद वारे हे करत असून, या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.