खोदा पहाड निकला चुहा, बजेटचा डोंगर निघाला उंदीर… अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

मुंबई: खोदा पहाड, निकला चुहा… शेतकऱ्यांवर अन्याय करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… बजेटचा डोंगर, निघाला उंदीर…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा अकरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अधिक वाचा..

फडणविसांचा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’…

मुंबई: शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर करताना घोषणांचा पाऊस पाडला. या अर्थसंल्पातून केलेल्या घोषणांची वास्तवात पूर्तता होणे कठीण आहे. फडणवीस यांनी केलेल्या अवास्तव घोषणा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला उध्वस्त करणाऱ्या व भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक करणाऱ्या आहेत. तुकाराम महाराजांच्या अभंगात सांगायचे तर हा अर्थसंकल्प म्हणजे, “बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेउनियां तृप्त कोण जाला”? असा […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून; 9 मार्चला सादर होणार अर्थसंकल्प

मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४चा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची […]

अधिक वाचा..

राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे…

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव सर्वपक्षीयांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा करावा… मुंबई: नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी आहे की सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी?

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी प्रशासक पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यावरुन सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी तयार करण्यात आलाय अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली. या अर्थसंकल्पात सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी सुरु असल्याचा […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा…

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा असून अर्थसंकल्पातून केवळ काल्पनिक परिणामांवर समाधान मानावे लागेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला मात्र यातून सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, असा हल्लाबोलही महेश तपासे यांनी […]

अधिक वाचा..