बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदीसह सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे २ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १५ जुलै ते २१ जुलै या कालावधीत घडली असून, या प्रकरणी खोपोली येथे वास्तव्यास असलेले एकनाथ जालिंदर इचके (वय ५६) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील बी बियाणांचे दुकान चोरट्यांनी फोडले; रोख रकमेसह सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): रांजणगाव लेण्याद्री अष्टविनायक महामार्गालगत असलेले बी. बियाणांचे दुकान चोरट्यांनी फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता.23) पहाटे दोन ते साडेतीनच्या वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर शेजारील कपड्याचे दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत […]

अधिक वाचा..
odisha money

अधिकाऱ्याच्या घरात मिळाले कोट्यवधी रुपयांचे घबाड अन्…

भुवनेश्वर (ओडिशा): एका सरकारी अधिकाऱ्याकडे तपास अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. अधिकाऱ्याच्या तीन घरांमधून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ओडिशा पोलिसांच्या पथकाने ही छापेमारी केली. पोलीस प्रशासकीय अधिकारी प्रसांताकुमार रौतच्या घरी छापा टाकण्यासाठी गेले, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला नाही. त्याच्या भुवनेश्वरमधील घराला पोलिसांनी घेराव घातला. काही वेळाने […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या एटीएम मशीन मधून नव्वद हजारांची रोकड चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शरद बँकेच्या एटीएम मशीन मधून मशीनची छेडछाड करुन एटीएम मशीन मधून तब्बल 90 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पेट्रोल पंप समोर शरद बँक असून बँकेच्या शेजारीच ATM मशीन आहे. बँकेचे […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर: शिरुर येथील बाबुराव नगर मधील पेराडाईज सोसायटी मध्ये राहणारे मनोहर ढमढेरे हे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ढमढेरे हे घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता कपाट उघडले आणि त्यातील सोन्याच्या २ अंगठ्या आणि काही रोख रक्कम चोरीला गेली […]

अधिक वाचा..