मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात मोठी वाढ; मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा फडणवीसांना अधिकार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारात महत्त्वाची वाढ करणारे ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६’ राज्य सरकारने अधिसूचित केले आहेत. नव्या नियमांनुसार, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकणार आहेत. यासंदर्भातील अधिसूचना आणि शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. नव्या नियमांमुळे मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांना थेट हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. […]

अधिक वाचा..

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कोंडीने उद्योगांना स्थलांतराची भीती; मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोरेगाव भीमा : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर फटका सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना बसत आहे. वाहतूक कोंडीवर वेळीच कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास चाकणप्रमाणे या परिसरातील उद्योगांनाही स्थलांतराचा विचार करावा लागू शकतो, अशी भीती इंडस्ट्रीअल फेडरेशन ऑफ महाराष्ट्रने व्यक्त केली आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी […]

अधिक वाचा..

हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; ५७ कक्षांच्या सुसज्ज वास्तूचे लोकार्पण

मुंबई : मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. राज्यात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी शिष्टमंडळे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवासासाठी हे अतिथीगृह सुसज्ज करण्यात आले आहे. या नव्या अतिथीगृहात एकूण ५७ कक्ष असून, त्यामध्ये ६ व्हीव्हीआयपी आणि ५१ इतर कक्षांचा समावेश आहे. तळमजला अधिक […]

अधिक वाचा..

तुकाराम मुंढेंना हटवू नका; परेश रावलांची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी, म्हणाले- ‘त्यांचं संरक्षण करणं हे कर्तव्य’

मुंबई : आपल्या धडक आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भेसळखोर, नियम मोडणारे आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे मुंढे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असतानाच आता बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही त्यांच्या कामाचं समर्थन केलं आहे. विशेष म्हणजे, तुकाराम […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जा विभागावर RTI टाळाटाळीचा आरोप; माहिती लपवण्यामागे नेमके कोण?

सौर कृषी पंप योजनेतील माहिती मागवूनही उत्तर न मिळाल्याचा पत्रकार विवेक भावसार यांचा दावा; प्रशासनाच्या पारदर्शकतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न. मुंबई : राज्य सरकार ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गंभीर आरोप समोर आले आहेत. TheNews21 आणि राजकारण (The Rajkaran) या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक-संपादक विवेक भावसार यांनी लिहिलेल्या संपादकीयातून […]

अधिक वाचा..

स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीचा शासकीय जयंती यादीत समावेश करा; भुजबळ-मुश्रीफ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या २२ जुलै या जयंतीचा राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांच्या अधिकृत सूचीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, […]

अधिक वाचा..

‘व्हीबी-जी राम जी’ कार्यशाळेला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती; ग्रामीण विकासाला नवी दिशा

मुंबई: विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात ‘विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) २०२६’ (व्हीबी-जी राम जी) कायद्यावरील कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेमुळे ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता आहे. राज्याने […]

अधिक वाचा..

शिंदे मुख्यमंत्री होणार? चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पूर्णविराम; म्हणाले…

मुंबई: राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रीपदाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असतानाच मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करून यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता असते आणि […]

अधिक वाचा..

मोठ्या पगाराचे आमिष दाखवून तरुणांची आंतरराष्ट्रीय तस्करी, सुटकेसाठी धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह देशातील शेकडो तरुणांची आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करून त्यांना म्यानमार-थायलंड सीमेवरील छळछावण्यांमध्ये डांबून जबरदस्तीने सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन संबंधित तरुणांच्या तातडीच्या सुटकेसाठी […]

अधिक वाचा..

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार गायकवाड […]

अधिक वाचा..