अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूवर वडेट्टीवार आक्रमक; आठ दिवसांत चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी रुग्णालयाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिटवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या दुर्घटनेपूर्वीच अग्निशमन विभागाने फायर सेफ्टी […]

अधिक वाचा..

मुंबईतील मृत्यूंवरून फडणवीस सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई: मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नसून सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक

मुंबई:“मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या […]

अधिक वाचा..