सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने सांस्कृतिक क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे. या महत्त्वाच्या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याबाबत अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असून मंत्रालय स्तरावरच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एप्रिल २०२६ अखेरीस तत्कालीन संचालक बिभीषण चवरे यांनी पदभार सोडल्यानंतर हे […]

अधिक वाचा..

संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तीन महत्त्वपूर्ण मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले. संसदीय कार्य विभागाची स्थापना १ जुलै १९७५ रोजी झाली होती. सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाचा भाग असलेला हा विभाग ८ जानेवारी २०१६ पासून स्वतंत्र विभाग म्हणून […]

अधिक वाचा..

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागाने स्वतंत्र आणि परिणामकारक कार्यप्रणाली विकसित करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. दि. १६ एप्रिल रोजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महिला सुरक्षेसंदर्भात निवेदन सादर केले होते. त्यानंतर […]

अधिक वाचा..

परिवहन विभागात बदली-वसुली रॅकेटचा आरोप; निलंबित अधिकाऱ्यांचा सहभाग? चौकशीची मागणी

मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना ‘क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण; शालेय शिक्षण विभागाचा केंब्रिजसोबत करार

मुंबई: पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने Cambridge University Press & Assessment इंडिया यांच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ या ई-लर्निंग उपक्रमासाठी शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हवामान शिक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात झालेल्या […]

अधिक वाचा..

मानधन योजना अडचणीत! सांस्कृतिक कार्य खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे लोककलावंत हैराण

मुंबई: राज्यातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य खात्याच्या ढिसाळ आणि असंवेदनशील कारभारामुळे गंभीर अडचणीत सापडली आहे. अनेक जिल्ह्यांत अद्याप मानधन निवड समित्याच गठीत झालेल्या नसून, सन २०२३ पासूनचे ऑफलाईन (प्रत्यक्ष) अर्ज धूळखात पडून असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे हजारो लोककलावंतांना मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत असून राज्यभर […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल अभिलेख शाखेतील संशयित बोगस नोंदी प्रकरणी प्रशासनाची उदासीनता; आत्मदहनाचा इशारा

शिरुर (तेजस फडके): शिरुर तहसिल कार्यालयाच्या अभिलेख शाखेत संशयित बोगस नोंदी असल्याचा गंभीर आरोप करत शिरुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी या नोंदींची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची लेखी मागणी तहसिलदारांकडे दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी केली होती. त्यानंतर २४ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित नोंद बोगस असल्याचा संशय व्यक्त करत स्वतंत्र तक्रार अर्जही सादर […]

अधिक वाचा..

घोड धरण परिसरात बेकायदा वृक्षतोडप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यावर गंभीर आरोप

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकारात पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता वैभव काळे हा अधिकारी थेट घटनास्थळी उपस्थित असून झाडे तोडण्याच्या कारवाईत सक्रीय सहभाग घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. घटनास्थळी काळ्या रंगाची “महाराष्ट्र शासन” अशी […]

अधिक वाचा..

घोडधरण परिसरात पाटबंधारे विभागाकडून बेकायदेशीर वृक्षतोड; लाकूड विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चिंचणी–घोडधरण परिसरात पाटबंधारे विभाग, शिरूर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड केल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंदाजे १५ ते २० वर्षे वयाची लिंब व इतर जातींची सुमारे २५ ते ३० मोठी झाडे पोकलेन मशिनच्या साह्याने तोडण्यात आल्याचा आरोप होत असून, या झाडांचे लाकूड गुणाट येथील एका खासगी लाकूड […]

अधिक वाचा..

राज्य सांस्कृतिक पुरस्काराला वामनदादा कर्डक यांचे नाव; सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय

मुंबई: लोककला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराला आता लोककवी वामनदादा कर्डक यांचे नाव देण्यात आले आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘ शासन निर्णय’ जारी केला. यापुढे या पुरस्काराला ‘लोककवी वामनदादा कर्डक राज्य सांस्कृतिक पुरस्कार – लोककला क्षेत्र’ असे नावाने ओळखले जाईल. लोककलेला योग्य प्रतिष्ठा […]

अधिक वाचा..