मोठी स्वप्ने पाहा, जिद्द आणि मेहनतीने यश मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

ठाणे: ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळविण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आपणही याच महापालिका शाळेचे विद्यार्थी असल्याची आठवण सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या […]

अधिक वाचा..

कष्ट अन् जिद्दीच्या जाेरावर समीक्षा शेलारची ग्रंथपाल पदाला गवसणी

कोरेगाव: नाशिक येथील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरतीतील ग्रंथपाल पदाच्या लेखी परीक्षेत म्हसवे (ता. सातारा) येथील समीक्षा संदीप शेलार हिने एसईबीसी (सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्ग) प्रवर्गातून महिलांत प्रथम क्रमांक पटकावला. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने पाच ऑक्टोबर २०२४ ला एकूण १७ पदनामांसाठी ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात काढली […]

अधिक वाचा..

शून्य अपघात चा निर्धार; शिरूर शहरात महावितरणतर्फे विद्युत सुरक्षा जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर (अरुणकुमार मोटे): विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने महावितरण शिरूर उपविभागातर्फे “शून्य अपघात हेच आमचं ध्येय” या मंत्राला आत्मसात करत, शिरूर शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा मोलाचा प्रयत्न करण्यात आला. रॅलीदरम्यान शहराच्या मुख्य मार्गांवरून मोटरसायकल्सच्या मिरवणुकीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. विद्युत सुरक्षेच्या सूचना दर्शवणारे […]

अधिक वाचा..