‘एपस्टिन फाईल’वरून राजकीय वाद पेटला

मोदींच्या राजीनाम्याची मागणी, काँग्रेस-वंचितचा नागपुरात धडक मोर्चा नागपूर: कथित ‘एपस्टिन फाईल’ प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाला “अत्यंत गंभीर व लाजीरवाणे” म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधानांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर प्रकाश […]

अधिक वाचा..

चौलमध्ये आशापुरी–हिंगुळजा मंदिर वाद पेटला; वनजमिनीवरील अतिक्रमणाचा आरोप

रायगड: रायगड जिल्ह्यातील चौल येथे आशापुरी देवी व हिंगुळजा देवी मंदिर परिसरावरून वाद निर्माण झाला आहे. वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम व मंदिराच्या नामांतराचा आरोप स्थानिक रामवंशी क्षत्रिय समाजाने केला आहे. संबंधित प्रकरणात तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नेमका वाद काय? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आशापुरी देवी व हिंगुळजा देवी या पारंपरिक दैवतांचे […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६! दिपाली–रुचिता यांच्यात तुफान वाद; ‘मी नव्हते ती’ म्हणत दिपालीचा संताप

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, घरातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सदस्यांमधील दडलेले वाद आता उघडपणे समोर येत असून, नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोने घरात खळबळ उडवून दिली आहे.या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत असून, हा वाद […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! चोरीच्या आरोपांवरून घरात रणकंदन; तन्वीचा शो सोडण्याचा इशारा तर…

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या आजच्या भागात घरात पुन्हा एकदा सामान चोरीचा मुद्दा चांगलाच पेटला. दीपालीने सामानाबाबत विचारणा केल्यानंतर विशाल आणि रोशन यांनी प्रभूचा कप्पा तपासला. या कप्प्यातून तांदूळ, पीठ आणि इतर साहित्य सापडल्याने घरात खळबळ उडाली. हे सामान कोणी लपवलं? हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. अनुश्रीने तन्वी आणि रुचिता यांच्यावर संशय व्यक्त केला. राकेशने […]

अधिक वाचा..

अखंड महाराष्ट्राच्या कुलदैवताच्या नगरीत काठ्यांची हाणामारी! भाविकांत भीतीचे वातावरण

जेजुरी (पुणे): अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गड परिसरात आज घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भक्ती, भंडारा आणि ‘येळकोट येळकोट’च्या जयघोषासाठी ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी किरकोळ वादातून थेट काठीहाणामारी झाल्याने जेजुरीची प्रतिमा मलीन झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका दुकानावर भंडारा […]

अधिक वाचा..

‘मुंब्रा हिरवा करू’ वक्तव्यावरून राजकीय वाद! AIMIM नगरसेविका सहर शेख अडचणीत

मुंब्रा: ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या AIMIM पक्षाच्या नव्या नगरसेविका सहर शेख यांच्या विजय भाषणातील “पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करू” या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. २२ वर्षीय सहर शेख यांनी निवडणूक विजयाच्या आनंदात […]

अधिक वाचा..

पुण्यात पुन्हा गँगवॉर; जुन्या वादातून युवकावर कोयत्याने हल्ला

पुणे: पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्या वादातून झेड ब्रिजजवळ काही युवकांनी एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या 2 गाड्यांचीही तोडफोड केली. यामुळे काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्ल्यात तरुण गंभीर […]

अधिक वाचा..