कमला नेहरू रुग्णालयात ७ मोफत आयसीयू खाटा; फेब्रुवारीअखेर रुग्णांसाठी सुविधा सुरू

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) खासगी संस्थेमार्फत चालवण्यात येत असून, या संस्थेसोबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारानुसार रुग्णालयातील एकूण १७ आयसीयू खाटांपैकी ७ खाटा थेट महानगरपालिकेच्या ताब्यात येणार असून, या खाटांवर दाखल होणाऱ्या रुग्णांना मोफत अतिदक्षता उपचार सेवा दिली जाणार आहे. ही सुविधा फेब्रुवारीअखेर रुग्णांसाठी उपलब्ध […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडला; फेब्रुवारीत ₹१५०० जमा होण्याची शक्यता

मुंबई: जानेवारी महिना संपत आला असतानाही राज्यातील लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असतानाही महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा ₹१५०० महिलांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, यंदा डिसेंबरचा हप्ता उशिरा मिळाल्यानंतर आता जानेवारीचाही हप्ता […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताहाचे आयोजन 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्ताने ‘स्वराज्य सप्ताहा’ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबाचे ही टॅगलाईन वापरत दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती, संत गाडगेबाबा जयंती, मराठी भाषा दिन अशा महत्त्वाच्या तिथींचा सुयोग्य संगम साधून विविध उपक्रम […]

अधिक वाचा..

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला; वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

मुंबई: वाचनाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया” च्या सहयोगाने दि.५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू.), तिसरा मजला, शारदा मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (दि. ५) फेब्रुवारी रोजी सकाळी […]

अधिक वाचा..

फेब्रुवारीत दोन दिवसीय ‘मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे’ आयोजन

मुंबई: राज्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव राबविण्यात येतो. मुंबई शहर जिल्ह्याचा ५ व ६ फेब्रुवारीला ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत आज जिल्हा समन्वय समितीची […]

अधिक वाचा..