गॅस टंचाईचा फटका मालिकांच्या सेटला; चहा-कॉफीऐवजी लिंबू सरबत

मुंबई: सिनेमा किंवा मालिकांच्या शूटिंग सेटवर कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी भरपूर खाण्या-पिण्याची सोय असते. अनेकदा दीर्घकाळ शूटिंग असल्यास दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व व्यवस्था निर्मात्यांकडून केली जाते. त्यामुळे सेटवर विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद कलाकारांना मिळत असतो.मात्र सध्या निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम थेट मालिकांच्या सेटवरही दिसून येत आहे. काही ठिकाणी जेवण तर दूरच, साधा चहाही मिळणे कठीण […]

अधिक वाचा..

गॅस तुटवड्यासाठी भाजपा सरकार जबाबदार; दांडी मार्चच्या प्रेरणेने आंदोलन करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असला तरी त्यामागे भाजपा सरकारची चुकीची धोरणे आणि नाकर्तेपणा कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दांडी मार्चची प्रेरणा घेऊन जनतेने आंदोलन करावे आणि सरकारला धारेवर धरावे, असे आवाहन त्यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ […]

अधिक वाचा..

एलपीजी दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन

मुंबई: केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात अचानक वाढ करून महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका करत या दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने गुरुवारी (१२ मार्च) राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांनी तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरवाढीबरोबरच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवण्यात आला […]

अधिक वाचा..

राज्यात गॅस टंचाईमुळे चूल विझण्याची वेळ सरकारने जनतेची दिशाभूल थांबवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी; विजय वडेट्टीवार 

मुंबई: राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे. सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आज काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत करण्यात आली. राज्यातील सद्यस्थिती […]

अधिक वाचा..

आखाती संघर्षाची झळ पुण्याला! पेट्रोल-डिझेल व गॅस टंचाईची चिन्हे

पुणे: पश्चिम आशियातील आखाती परिसरात सुरू असलेल्या इराण–इस्रायल–अमेरिका तणावाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला असून महाराष्ट्रात इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: पुण्यात येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल आणि गॅस टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या […]

अधिक वाचा..