मंगळवारी १६ सप्टेंबरला टिळक भवनमध्ये काँग्रेसचा रोजगार मेळावा 

४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार, बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी मुंबई: राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली असून शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये होणार मोफत आरोग्य तपासणी शिबिर

शिरूर (अरुणकुमार मोटे): हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन यांच्या वतीने शिरूर येथे मोफत महाआरोग्य शिबिर आणि मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय येथे हे शिबिर पार पडणार आहे. गरजूंना मोफत चश्म्यांचे वाटप देखील या शिबिरात […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला चिंतन शिबिर नागपूरमध्ये; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती..?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथे चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आजी – माजी आमदार, आजी – माजी खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते यांचा समावेश असणार आहे. […]

अधिक वाचा..

गणपती मंडळाच्या सहकार्याने कवठे येमाई येथे भव्य संजय गांधी निराधार योजना शिबिर संपन्न

७६ लाभार्थ्यांचे अर्ज प्रक्रिया पूर्ण; शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळविण्याकडे मोठे पाऊल शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई गावात सामाजिक कार्याचा वसा जोपासणाऱ्या श्री गुरुदेवदत्त फ्रेंडशिप ग्रामविकास प्रतिष्ठान, कवठे या गणपती मंडळाने (दि. २) सप्टेंबर २०२५ रोजी एक भव्य संजय गांधी निराधार योजना शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या सामाजिक […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

मुंबई: भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, […]

अधिक वाचा..

भाजपचे प्रवक्ते पदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती करू नये

सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती, ही नियुक्ती रद्द करावी; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार मुंबई: न्यायव्यवस्थेकडे जनता आशेने बघते. अलीकडे न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयात झाली आहे.  2024 मध्ये त्यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला ,त्यांनी प्रवक्त्या म्हणून काम केले आहे. प्रवक्ता म्हणून काम केलेल्या व्यक्तीला न्यायाधीश म्हणून निवड करणे […]

अधिक वाचा..

निवडणुकीच बिगुल वाजल! महाराष्ट्रात OBC आरक्षणासह निवडणुका होणार

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022 च्या पूर्वीच्या वॉर्ड […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती निवडणुकीचे बिगुल वाजले; ‘या’ दिवशी मतदान

नवी दिल्ली: देशाच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रतिष्ठेच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला असून, या घोषणेसोबतच राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. जगदीप धनखर यांनी आरोग्याच्या कारणावरून उपराष्ट्रपतीपदाचा 21 जुलै 2025 रोजी राजीनामा दिला. त्यांच्या अचानक राजीनाम्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले […]

अधिक वाचा..

मी कोणाचा विनयभंग केला की चोऱ्यामाऱ्या? राजीनामा देण्यासारखं घडलं काय

मुंबई: सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ असो किंवा शेतकऱ्यांबद्दलची आक्षेपार्ह विधाने.. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना चर्चेत कसं रहायचं ते नीट समजतं. काही दिवसांपूर्वीच कोकाटे यांचा सभागृहात रमी ( पत्ते) खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तो व्हिडीओ ट्विट केल्यावर प्रचंड खळबळ माजली, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला, राज्यातील […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! पुण्यातील या विधानसभा मतदारसंघात होणार फेरमतमोजणी

पुणे: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, या निवडणुकीत इव्हीएम मशीनवर अनेक प्रश्न उपस्थित करत मतांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांनी फेरमतदानाची मागणी केली होती.आता या विषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची […]

अधिक वाचा..