कान्हूर मेसाई परिसरात बिबट्याचा वाढता वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पाबळ: कान्हूर मेसाई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात तसेच वस्त्यांच्या परिसरात बिबट्या वारंवार दिसत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कान्हूर परिसरातील शेतांमध्ये आणि गावालगतच्या भागात काल रात्री पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे रात्री-अपरात्री शेतीकामासाठी, पाणी भरण्यासाठी […]
अधिक वाचा..