यंत्रणांचा गैरवापर करुन बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न; जयंत पाटील

मुंबई: विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्याविरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे पडल्यानंतर जयंत […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या जागा एकत्रित, एकदिलाने लढवेल…

मुंबई: मराठवाडयाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर नागपूरची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कोकणातील जागा शेतकरी कामगार पक्ष व अमरावती व नाशिक कॉंग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. महाविकास आघाडीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी […]

अधिक वाचा..

अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही…

मुंबई: जोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे यासाठी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणी केली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या खासदार सुप्रियाताई […]

अधिक वाचा..

आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत; जयंत पाटील

जळगाव: आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत आहे. आपण स्वाभिमान जपला म्हणून आपण ताठ मानेने लोकांच्या समोर जावू शकतो. त्यामुळे लोकांपर्यंत जा. येत्या दीड – दोन वर्षात निवडणुका लागतील. आपण लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेत येवू अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जळगाव शहर व जिल्हयाचा आढावा […]

अधिक वाचा..

जागतिक पातळीवर गौरवलेले महाविकास आघाडी सरकार कपटाने पाडण्यात आले…

कोल्हापूर: महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले. ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र कपटाने सरकार पाडण्यात आले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे केली. फुटीर आमदारांच्या मतदारसंघात फिरून […]

अधिक वाचा..

आपली लढाई लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी; जयंत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा…

मुंबई: दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे. मात्र हा अंतिम निर्णय आहे, असे वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित दिसते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोग आपली कार्यवाही […]

अधिक वाचा..

जनमताचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी संधी…

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी मराठवाडा विभागाच्या दौर्‍यावर असून त्यांनी अहमदनगर व औरंगाबाद येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांकडून पक्ष वाढीसंदर्भात त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. मागील काळात आपल्या या जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणावर पवार साहेबांना ताकद दिली होती याची आठवणही […]

अधिक वाचा..

सुनावणी सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर बसणे संकेतांना धरुन नाही…

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठासमोर सुनावणी सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरुन नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत […]

अधिक वाचा..

शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा: जयंत पाटील

मुंबई: देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच मध्यमवर्गीयांच्या मानगुटीवर बसलेला महागाईचा राक्षस नष्ट व्हावा, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गणरायाला घातले. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर आज दोन वर्षानंतर राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानीही […]

अधिक वाचा..