‘कमळी’तील अन्नपूर्णा आजींचा प्रवास: टीकेपासून आत्मविश्वासापर्यंत!

मुंबई: कमळी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेने ठरलं तर मग ला तगडी स्पर्धा देत टीआरपीच्या शर्यतीत दमदार कामगिरी केली आहे. मालिकेतील कमळीप्रमाणेच घराची कर्ती, जबाबदार आणि कणखर अन्नपूर्णा आजींची भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. अन्नपूर्णा आजींची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांनी साकारली आहे. मालिकेत त्या आपल्या हरवलेल्या […]

अधिक वाचा..

रागाच्या त्या एका क्षणाने संपला दिव्या शिंदेचा ‘बिग बॉस मराठी ६’चा प्रवास!

मुंबई: ‘बिग बॉस’च्या घरात भांडणं, वाद, तंटे हे नवीन नाहीत. मात्र फार क्वचित प्रसंगी हे वाद इतक्या टोकाला जातात की स्पर्धकाला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला जातो. ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या सीझनमध्येही अशा घटना घडल्या आहेत. दुसऱ्या सीझनमधील पराग कान्हेरेची हकालपट्टी, पाचव्या सीझनमधील आर्या जाधवचं बाहेर जाणं आणि आता सहाव्या सीझनमध्ये दिव्या शिंदेची एक्झिट या सगळ्यांच्या […]

अधिक वाचा..

शेतीचा कचरा नाही, सोन्याची खाण! सतीश महातोंचा सायकलवरचा प्रवास ते उद्योजकतेचा शिखर

सायकलवर भाज्या नेणारा सतीश महातो ठरतोय हजारो शेतकऱ्यांचा आधार रांची: “संकटातून संधी निर्माण होते,” असे म्हटले जाते. मात्र काही मोजकेच लोक या संधीचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीपुरता न ठेवता समाजाच्या भल्यासाठी करतात. झारखंडमधील रांची जिल्ह्यातील चिपरा या छोट्याशा गावातील सतीश महातो हे असेच एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. कधी सायकलवर भाज्यांचे ओझे घेऊन नदी ओलांडत […]

अधिक वाचा..

कर्तव्याच्या वाटेवरचा ३० वर्षांचा देदीप्यमान प्रवास

कान्हूर मेसाईचे सुभेदार मनोजकुमार दळवी यांचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न कान्हूर मेसाई (सुनील जिते): कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील रहिवासी व भारतीय लष्करातील सुभेदार मनोजकुमार दळवी यांनी तीस वर्षांची प्रदीर्घ आणि निष्ठावान लष्करी सेवा पूर्ण करून नुकतीच निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या या गौरवपूर्ण सेवेच्या सन्मानार्थ रविवारी (ता. ११) गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक आणि सेवापूर्ती गौरव […]

अधिक वाचा..

पुणे – नाशिकचा प्रवास दोन तासांनी घटणार

पुणे: नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) हा ३० किलोमीटर लांबीचा पुणे-नाशिक महामार्ग उन्नत होणार आहे. त्यामुळे सध्या या मार्गादरम्यान प्रवासासाठी लागणारा दीड-दोन तासांचा कालावधी अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे. त्याकरिता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून, २५ सप्टेंबर रोजी निविदा खुल्या करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, ‘एनएचएआय’ने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण […]

अधिक वाचा..

सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळात गोंधळ

मुंबईतील टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णयाची टोलवाटोलवी मुंबई: मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत […]

अधिक वाचा..

सलाम त्यांच्या कार्याला! ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

मुंबई: मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे आज निवृत्त झाले आहेत. दया नायक हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. १९९५ साली दया नायक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर आता सुमारे ३१ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास थांबला. संघर्ष, वादग्रस्त वळणं आयुष्य दया नायक यांच्या वाट्याला आले. जेवढी प्रसिद्धी आली तेवढीच […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा, या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीच्या दौर्‍याची सुरुवात…

नंदुरबार: विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजपासून (रविवार दिनांक २६ मार्च ) “राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…” या दौऱ्याला सुरुवात केली. राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ अभिवादनासाठी 2 हजार किलोमीटर सायकल प्रवास

उत्तर प्रदेश मधील भीमा भारती हा युवक झाला कोरेगाव भीमात दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी या शौर्यदिनी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखो भीम सैनिक येत असताना नुकतेच येथे नव्याने भीमसैनिक दाखल होण्यास सुरुवात झालेली असताना चक्क उत्तर प्रदेश येथून जात तोडो समाज जोडो हा संदेश देण्यासाठी भीमा भारती हा […]

अधिक वाचा..

ओढयाच्या पाण्यातून शाळेत जाण्यासाठी विध्यार्थ्यांसाठी जीवघेणा प्रवास

सविंदणेत विविध ठिकाणी ओढयावर पुलाची मागणी…. सविंदणे: सध्या शिरुर तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून ओढया नाल्यांना मोठे पूर आले आहेत. सविंदणे येथे लोणी- धामणीवरुन वाहणाऱ्या ओढयावर सविंदणे गावच्या उत्तर बाजूला भोरवस्ती, पडवळमळा, मडके आळी, किठेमळा, प्रगती नगर अशा लोकवस्त्या शेताच्या ठिकाणी सोईनुसार मोठया प्रमाणात विखुरल्या आहेत. ओढयावर पुल नसल्यामुळे जीवघेणा मार्ग काढत ओढयाच्या कमरे इतक्या […]

अधिक वाचा..