आष्टीला मोठी न्यायिक भेट! दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला न्यायिक सुविधेची मोठी भेट मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून बीड जिल्ह्यातील नागरिक, वकील संघटना आणि सामाजिक संस्थांनी उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचे […]

अधिक वाचा..

भारतातील यस बँक जपानी सुमितोमो बँकेला विकण्याच्या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करा

यस बँकेची विक्री भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा आणणारी, कोणाच्या हितासाठी यस बँक विक्रीचा घाट घातला जात आहे मुंबई: जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने (SMBC) अलीकडेच भारतातील खाजगी क्षेत्रातील महत्वाच्या YES बँकेत सुमारे ₹१३,००० कोटींची गुंतवणूक करून २०% हिस्सा विकत घेतला आहे. पुढील टप्प्यात ₹३०,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करून ५१% हिस्सेदारीसह YES […]

अधिक वाचा..

सोमनाथ सुर्यवंशींच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून न्यायालयीन चौकशी करा

मुंबई: परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली, अनेक निष्पाप नागरिकांना अटक केली. आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यालाही अटक करुन कोठडीत मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला पण सरकारने या प्रकरणी पोलिसांवर कठोर कारवाई केली नाही. […]

अधिक वाचा..

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रियेची माहिती त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करावेत

पुणे: तिसरे विश्व मराठी संमेलन २०२५ उत्साहात सुरु असून, आज दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कायदा व महिलांना मराठी भाषेत न्याय या विषयावर दोन विशेष परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. अनुराधा परदेशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. या परिसंवादात महिला सक्षमीकरण कायद्याची अंमलबजावणी आणि […]

अधिक वाचा..