ज्यांनी हक्कभंग दाखल केला ते वादी असतात तेच समितीत हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही

मुंबई: विधीमंडळात ज्यांनी खासदारांच्या वक्तव्यावर हक्कभंग दाखल केला त्याच सदस्यांना हक्कभंग समितीमध्ये घेण्यात आले हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नसल्याने ही समिती पुनर्गठीत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार केली. विधानसभेचे कामकाज खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून बुधवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. आज सभागृह सुरू होताच […]

अधिक वाचा..

धारीवाल वीज प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील धारीवाल वीज प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याची आग्रही भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली. धारीवाल वीज प्रकल्पाने वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठयासाठी एकच तळे बांधून साठवणूक केली. त्यामुळे जिल्ह्यातील येरुर व सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पाणी साठा तळ्याची दानवे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी […]

अधिक वाचा..

राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे…

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव सर्वपक्षीयांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा करावा… मुंबई: नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. […]

अधिक वाचा..

पुणे येथे न्याय हक्कासाठी मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत चक्री उपोषण सुरु 

शिरुर (तेजस फडके): पुणे येथील पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कंपन्यांच्या तक्रारी संदर्भात न्याय मिळेपर्यंत बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. रांजणगाव एमआयडीसीतील MEPL कंपनीने केमिकल युक्त अति प्रदूषित पाणी मातंग समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या दिशेने सोडलेले आहे. त्यामुळे त्यांची शेती पूर्णपणे […]

अधिक वाचा..

न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या आठवणींना कन्हेरसर करांकडून उजाळा

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यातील कन्हेरसर गावचे सुपुत्र असलेले धनंजय चंद्रचूड यांनी भारताचे पन्नासावे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतल्याने कन्हेरसर गावाला दुसऱ्यांदा सरन्यायाधीश पदाचा मान मिळाला असल्याने कन्हेरसर येथे ग्रामस्थांनी जल्लोष करत न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कन्हेरसर ता. खेड येथील यशवंतराव चंद्रचूड यांनी यापूर्वी भारताच्या सरन्यायाधीश पदाची धुरा सांभाळलेली असताना आता नुकतेच त्यांचे […]

अधिक वाचा..

इस्पात कंपनीतील पीडित कामगारांना न्याय मिळावा…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील २२ वर्षापुर्वी टाळेबंदी करुन कंपनीतील ५ हजार कामगारांचे भवितव्य धोक्यात आलेले असताना सध्या कंपनी विक्री केली. मात्र योग्य न्यायासाठी इस्पात कंपनीची गैरव्यवहारांची चौकशी करुन पिडीत कामगारांना न्याय मिळाव, अशा मागणीचे निवेदन कंपनीच्या गेटवर राष्ट्रवादी श्रमशक्ती महासंघाच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील इस्पात कंपनी […]

अधिक वाचा..

सामाजिक संघटनामुळे सर्व सामान्य व्यक्तींना मिळतोय न्याय: राहुल श्रीरामे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य यांसारख्या सामाजिक संघटना ह्या प्रशासन आणि सर्वसामान्य व्यक्ती यांच्या मधला दुवा असतात. या संघटना अनेक दुर्लक्षित झालेले सामाजिक विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणुन देतात त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळतो, असे प्रतिपादन पुणे शहराचे वाहतुक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले. ढोकसांगवी (ता. शिरुर) येथे नुकतेच भ्रष्टाचार विरोधी […]

अधिक वाचा..