शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी GST लूट थांबवा…

मुंबई: केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाहीत. खते, बि-बियाणे, शेती […]

अधिक वाचा..

कर्नाटकच्या जनतेने दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट थांबवली…

मुंबई: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही कर्नाटक प्रमाणे […]

अधिक वाचा..

हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरु आहे; जयंत पाटील

मुंबई: हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केला. हिंदू देवस्थानांच्या जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहितीच कागदपत्रांसहीत जयंत पाटील यांनी सभागृहात सादर केली. या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला […]

अधिक वाचा..

माथाडीच्या नावाखाली आर्थिक लूट करणाऱ्या मूळ सूत्रधारावर कारवाई करुन अटक करा:- बाप्पुसाहेब शिंदे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC त गेल्या अनेक दिवसांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून ट्रक चालकांची “आर्थिक लूट” करणाऱ्या दोन जणांवर आज (दि 6) रांजणगाव पोलिसांनी ट्रक चालकाने फिर्याद दाखल केल्याने खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे MIDC त खळबळ उडाली आहे. परंतु माथाडीच्या नावाने बोगस पावत्या बनवुन जबरदस्तीने “आर्थिक लूट” करणाऱ्या बड्या […]

अधिक वाचा..

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक थांबावी, जनता दलाची साखर संचालकांकडे मागणी

शिरुर (तेजस फडके): सध्या राज्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र असून त्यात पाणी पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे ऊस वाळू नये व वेळेवर गाळपासाठी जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा तोडणी व वाहतूकदार घेत असुन ते शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणुक करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी याबाबत कारखान्याच्या […]

अधिक वाचा..

तळेगाव दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची लुट

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात जमिनींना सोन्याचे भाव आलेले असल्याने अनेकदा दुय्यम, निबंधक कार्यालयात नागरिकांची वेगवेगळ्या कारणाने गर्दी झालेली असताना दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांकडून खाजगी वकिलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह नागरिकांची आर्थिक लुट होत असल्याची तक्रार नोंदणी महानिरीक्षकांसह मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे दुय्यम निबंधक कार्यालय असून येथे नेहमी जमिनीचे खरेदी, विक्री, हक्कसोड […]

अधिक वाचा..